आम्ही सावित्रीच्या लेकी निबंध मराठी | Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi

Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi – मित्रांनो आज “आम्ही सावित्रीच्या लेकी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi

भारताच्या प्रथम महिला शिक्षीका, एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका, घरा-घरांत ज्ञानज्योत लावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांनी घेतलेला स्त्रीशिक्षणाचा वसा आज त्यांच्या लेकी अगदी समर्थपणे पुढे नेत आहेत.

सावित्री बाईंचा जन्म सातारा येथे झाला. एकोणिसाव्या शतकात जेंव्हा समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व होते तेव्हा समाजात खूप विषमता होती. अस्पृश्य जाती पाती, सती – प्रथा, बाल विवाह, अनिष्ठ रूढी, परंपरा यांनी समाज वेढलेला होता. त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते.

समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्री बाईंचे पती त्यांना समाजातील विषमतेची जाणीव झाली. तेंव्हा त्यांना असे दिसून आले कि घर चालवणारी घरची स्त्री हीच मुळात अशिक्षित आहे. घरातील स्त्री अशिक्षित असल्यास कुटुंब कसे शिक्षित होईल, समाज सुधारण्यास गती मिळणार नाही म्हणुनच त्यांनी ठामपणे स्त्री शिक्षणाचा निर्णय केला. त्यांनी योजनेला स्वताच्याच घरा पासून सुरवात केली . त्यांनी त्यांची पत्नी सावित्री बाई फुले यांना शिकवले. त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. “Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi”

आम्ही सावित्रीच्या लेकी निबंध मराठी

समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. दोघांनी मुली गोळा करून मुलींची शाळा सुरू केली.

आज प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर दिसत आहेत. अनेक ठिकाणी ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रात, वकिली, व्यवसाय, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस व इतर क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत.  सावित्रीबाईनी महिला शिक्षणामध्ये दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या तपस्येतूनच आजची महिला शिक्षित झाली. नव- नवीन क्षितिजे गाठण्यात यश हे सावित्री बाईंच्या खडतर तपस्ये मुळेच. {Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi}

Aamhi Savitrichya Leki Nibandh

सावित्री बाई फुले नसत्या तर आज इंदिरा गांधी पंतप्रधान, कल्पना चावला अंतराळवीर, सानिया मिर्झा खेळाडूं याही झाल्या नसत्या. सावित्रीबाई नसत्या तर आजची नारी आधुनिक झाली नसती. तिची धांव फक्त घराच्या कुंपणा पर्यंतच मर्यादित राहिली असती. फक्त “चूल आणि मुल” हेच तिचे विश्व राहिले असते. म्हणूनच आम्ही आदराने व गर्वाने म्हणतो. “आम्ही सावित्रीच्या लेकी”.

तर मित्रांना “Aamhi Savitrichya Leki Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “आम्ही सावित्रीच्या लेकी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

भारताच्या प्रथम महिला शिक्षीका कोण?

भारताच्या प्रथम महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले आहेत.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 831 रोजी झाला.

Leave a comment