आरसा नसता तर निबंध मराठी | Aarsa Nasta Tar Nibandh Marathi

Aarsa Nasta Tar Nibandh Marathi – मित्रांनो आज “आरसा नसता तर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे ‘आरसा’ घरातून बाहेर पडताना लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्या-शिवाय राहत नाही.

Aarsa Nasta Tar Nibandh Marathi

शहरांतून कचऱ्यात काम करणाऱ्या तसेच कॉलेजात शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये ‘आरसा’ आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेजयुवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो.

सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे. हा आरसा माणसानेच शोधून काढला. त्यापूर्वी तो काय करत असेल? फार तर पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असेल. Aarsa Nasta Tar Nibandh Marathi

इतरेजनांना पाहणारा माणूस स्वत:ला मात्र पाहू शकत नसेल. आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती.

आरसा नसता तर निबंध मराठी

आपल्या जीवनातील विविध प्रसंगी आपली छबी आपण पाहावी, असे माणसाला वाटत असते आणि मग नकळत तो आरशाकडे जातो. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो.

आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे. “Aarsa Nasta TarNibandh Marathi”

आरसा नसेल तर कदाचित माणसामाणसांतील सहकार्य वाढेल. कारण आपल्या कपाळावरील टिकली नीट लागली आहे ना, हे ठरवण्यासाठी सासूबाईंना सुनेलाच विचारावे लागेल.

Aarsa Nasta Tar Nibandh Marathi

आजोबा नातवाला मदत करतील आणि नातू आजोबांना ! आरशाला संस्कृतमध्ये ‘आदर्श’ म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरुपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा ‘प्रामाणिकपणाचा आदर्श’ आहे.

म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरुप माणसांना वाईट वाटले नसते. ‘Aarsa Nasta Tar Nibandh Marathi’

आरसा नसता तर कुरूप स्त्रियांना आपल्या कुरुपतेची जाणीव झाली नसती. हलवायाची दुकाने, सोनाराची दुकाने आणि अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते.

आरसा नसता तर निबंध मराठी

अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारीनाही उपयोगी पडतात.

गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच !

“दुसऱ्याला दाखवतांना
कधी त्यालाही वाटते,
माझेही प्रतिबिंब
कुणी मला दाखवावे…”

तर मित्रांना “Aarsa Nasta Tar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “आरसा नसता तर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment