आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadi Ekadashi Nibandh Marathi

Ashadi Ekadashi Nibandh Marathi – मित्रांनो आज “आषाढी एकादशी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता संत एकनाथ, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांसारख्या संतपरंपरेचा महान वारसा लाभला आहे .

Aashadhi Ekadashi Nibandh Marathi

‘ सर्वांमध्ये विठ्ठल ‘ म्हणजेच सर्व समान आहेत अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनांत रुजवली. या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली.

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी होय. ही एकादशीला महाएकादशी या नावाने ही ओळखली जाते.

वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात मात्र त्यापैकी आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक, वारकरी वारी मध्ये चालत पंढरपूरला जातात. Ashadi Ekadashi Nibandh Marathi

जीवनात एकदातरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रिस्थ होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.

आषाढी एकादशी निबंध मराठी

आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येते .

या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठूनामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. Ashadi Ekadashi Nibandh Marathi

काया ही पंढरी, आत्मा हा विठठल
नांदनी केवळ पांडुरंग ॥
जय जरी हरी विठठ्ल ॥

Ashadi Ekadashi Nibandh Marathi

आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात. पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे. अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं वारकरी विठोबाकडे मागतो.

मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताना दिसून येतात. आषाढ महिन्यात पाऊस असतो. अग्नी मंद होऊन पचनसंस्था मंदावलेली असते. अशावेळी जड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नसते. “Ashadi Ekadashi Nibandh Marathi”

अशावेळी पचायला सोपे पदार्थ खाणे, कमी आहार घेणे हे उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच या काळात उपवास करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. अशाप्रकारे आषाढी एकादशी चे शास्त्रिय महत्व देखील आहे.

आषाढी एकादशी निबंध मराठी

मराठी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे.

प्रत्येक आषाढी एकादशीला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. आषाढी एकादशी म्हटले की ओढ लागते पांडुरंगाच्या दर्शनाची आणि डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी.

Aashadhi Ekadashi Nibandh Marathi

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे.

वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक संशोधक वारीमध्ये सहभागी होतात. ही वारी त्यांना अद्भुत आनंदानुभूती देऊन जाते. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.

आषाढी एकादशी निबंध मराठी

ज्या विठ्ठलासाठी कित्येक मैल प्रवास चालत केला त्या देवता ची भेट झाल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

|| हेचि दान देगा देवा ||
|| कोरोनाचा नाश व्हावा ||
|| अखंडित मिळो तुझी वारी ||
॥ जय जय राम कृष्ण हरी||

तर मित्रांना “Aashadhi Ekadashi Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “आषाढी एकादशी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आषाढी एकादशी कधी असते?

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी होय.

Leave a comment