बालकामगार, बालमजुरी निबंध मराठी | Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi

Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi

Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi – मित्रांनो आज “बालकामगार, बालमजुरी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi

आपल्या देशात देवाच्या बाल रूपाची अनेक मंदिरे आहेत. जसे बाल गणेश, हनुमान, श्रीकृष्ण इत्यादी. आपल्या देशात मुलांना देवा घरची फुले म्हटले जाते.

ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, लव कुश, अभिमन्यू या सारखे अनेक बालक भारतीय संस्कृतीत होऊन गेलेत. परंतु आजच्या काळात भारतात गरिबी ची स्थिती मोठ्या प्रमाणात आहे. देशातील गरीब मुलांची स्थिती चांगली नाही.

बालश्रम व बालकामगार आपल्या देशाची मोठी समस्या आहे. बाल मजुरी मुळे गरीब मुलांचे भविष्य अंधकामय होत आहे. 14 ते 18 वर्षाच्या लहान मुलांद्वारे काम करून घेणे म्हणजेच बाल मजुरी होय.

बालकामगार, बालमजुरी निबंध मराठी

कमी वयात काम करणाऱ्या या मुलांना बालकामगार म्हटले जाते. कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी तरुण व लहान मुलांची शक्ती खूप उपयुक्त असते.

परंतु आपल्या देशातील काही लोक थोड्या पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलांना बालमजुटी च्या कामाला लाऊन देतात. कमी पैशात कामगार मिळाल्याने हॉटेल, कारखाने व दुकानीचे मालकी या मुलांना कामावर ठेवून घेतात.

आज आपल्या देशातील गरीब मुले हॉटेल, कारखाने, दुकानी, धार्मिक स्थळ व इतर ठिकाणी कामे करतांना दिसतात. काही मुले तर मोठ मोठ्या कारखान्यामध्ये धोकादायक कामगिटी करतानाही दिसून जातात.

Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi

भारतीय राज्यघटनेच्या 1950 च्या कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात काम दिले जाणार नाही. व जर कोण्या कारखान्यात या कायद्याचे उल्लंघन होताना आढळले. तर भारतीय विधिमंडळाने फॅक्टरी अॅक्ट 1948 आणि चिल्ड्रेन अॅक्ट 1969 मध्ये तरतुदी करून फॅक्टरी मालकावर दंड व कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार प्रत्येक राज्य शासनाचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या निशुल्क शिक्षणाची व्यवस्था करावी.

हा देखील निबंध वाचा »  ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी | Granth Hech Guru Nibandh Marathi

बालकामगार व बाल मजुरी ही समस्या फक्त भारतात नसून जगातील अनेक विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात आहे.

गरिबी रेषेखालील आई – वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत. या शिवाय जीवन जगण्यासाठी पेश्यांची देखील आवश्यक असते.

बालकामगार, बालमजुरी निबंध मराठी

म्हणूनच आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची गरीब आईवडील कामावर पाठवतात. मागील काही वर्षात शासनाच्या प्रयत्नामुळे देशातील बालकामगारांची संख्या बरीच कमी झाली आहे. भारत शासनाचे हे काम प्रशंसनीय आहे.

आपल्या देशात आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या शिवाय शाळेतच मुलांना मध्यान भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु अजूनही देशात बालकामगाटांची समस्या आहे. या गंभीर समस्या वर लवकरात लवकर उपाययोजना करायला हवी. व भारत शासनाच्या या कार्यात सहयोग करणे देशातील नागरिकांचे देखील कर्तव्य आहे.

तर मित्रांना “Balkamgar, Balmajuri Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “बालकामगार, बालमजुरी निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

 

बाल मजुरी म्हणजे काय?

14 ते 18 वर्षाच्या लहान मुलांद्वारे काम करून घेणे म्हणजेच बाल मजुरी होय.

हा देखील निबंध वाचा »  बेटी बचाओ बेटी पढ़ाओ निबंध मराठी | Beti Bachao Beti Padhao Nibandh Marathi

कायद्याची स्थापना झाली कधी झाली?

१९८६ साली गुरुपदस्वामी कमिटीने मांडलेल्या मुद्दयांवरुन, बालमजुर (थोपवणे व कमी करणे) कायद्याची स्थापना झाली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top