dr babasaheb ambedkar nibandh in marathi मित्रांनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी
dr babasaheb ambedkar nibandh in marathi भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते व युगपुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात ख्याती होती.
खालच्या समाजात जन्म घेऊन ही आपल्या कर्तृत्वाने व कार्याने माणूस किती मोठा होऊ शकतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिले.
थोर देश भक्तांत डॉ. आंबेडकरांची गणना केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण नाव ‘भीमराव रामजी आबेडकर’ असे होते. १४ एप्रिल, १८२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली या गावी त्यांचा जन्म झाला.
खालच्या समाजात जन्माला आल्यामुळे त्यांना लहानपणी खूप त्रास व छळ सहन करावा लागला. आई-वडिलांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्यावर चांगले संस्कार केले.
कुशाग्र व तल्लख बुद्धीमुळे त्यांचा वर्गात नेहमी पहिला नंबर असे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही आंबेडकरांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले.
बडोद्याच्या महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस पाठविले. उच्च शिक्षण घेऊन ते भारतात परत आले, तरीसुद्धा त्यांना लोकांकडून त्रास सहन करावा लागला.
उच्चशिक्षित असूनही त्यांना अस्पृश्यतेची जाणीव केली जात होती. या सर्व गोष्टींची त्यांना चीड आली व त्यातूनच त्यांनी अस्पृश्य उद्धाराचे काम हाती घेतले.
dr babasaheb ambedkar nibandh in marathi
मुंबईत त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला. प्रगाढ विद्वत्ता व कायद्याचा सखोल अभ्यास यामुळे त्यांचा या व्यवसायात चांगलाच जम बसला.
अस्पृश्यांना सर्वसामाजिक हक्क मिळावेत म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रातून आपले विचार
मांडले व जनजागृती केली.
त्यांच्या या कार्याला हळूहळू यश मिळाले. त्यांनी चळवळ करून अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला, सार्वजनिक पाण्याच्या विहिरी सर्व लोकांना पाणी भरण्यास मोकळ्या करून दिल्या.
या कार्यासाठी त्यांना बराच विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी अस्पृश्यांना न्याय्य हक्क मिळवून दिले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाला त्यांनी जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले.
त्यांच्या अविरत कष्टाला शेवटी यश आले. बाबासाहेबांच्या अंगी अनेक अलौकिक गुण होते. वक्तृत्व, लेखन या गुणांची त्यांना देणगी लाभली होती.
जगप्रसिद्ध कायदेपंडित, विद्वान अशी त्यांची जगप्रसिद्ध ख्याती होती. त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. त्यांच्या ग्रंथालयात हजारो पुस्तकांचा साठा होता.
भारत स्वतंत्र झाल्यावर जी भारतीय घटना तयार झाली, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे श्रेय होते. १९५६ साली त्यांनी आपल्या लाखो बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
त्यानंतर दोन महिन्यांनी हे दलितांचे कैवारी या जगातून निघून गेले.
तर मित्रांना तुम्हाला “dr babasaheb ambedkar nibandh in marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – [email protected]
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
Pingback: घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना - Maharashtra Yojana
Pingback: 'मी पंतप्रधान झालो तर'... निबंध मराठी | mi pantpradhan zalo tar - निबंध मराठी
Pingback: वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Nibandh Marathi - निबंध मराठी