डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी | Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi

Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi – मित्रांनो आज “डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यात पापळ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव कदम होते. त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनाव प्राप्त झाले.

पंजाबरावाचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून इ.स. 1928 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. पदवी संपादन करण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.

इंग्लंडला त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम.ए व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डि.लिट. या पदव्या मिळविल्या. तेथे त्यांना वैदिक वाङमयातील धर्माचा उगम व विकास या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आली. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी वकिलची पदवी संपादन केली. “Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi”

डॉ. पंजाबराव देशमुख निबंध

तेथील शिक्षणक्रम संपल्यानंतर इ.स. 1926 मध्ये ते भारतात परत आले. इ.स.1926 मध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी ‘श्रद्धानंद छात्रालयाची’ स्थापना केली. 1927 मध्ये शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी ‘शेतकरी संघाची’ स्थापना केली. या संघाच्या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यात जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वृत्तपत्र चालवले.

अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले. तसेच त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. अमरावतीचे अंबाबाई मंदिर अस्पृश्यांना खुले करावे म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता. शिक्षणक्रांती हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या वेळी त्यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या. विदर्भाचा शैक्षणिक विकास व्हावा, शिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना अमरावती येथे केली. {Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi}

Dr. Panjabrao Deshmukh Nibandh

शेतकरी कर्जातून मुक्त झाला पाहिजे यामध्ये डॉ. पंजाबराव यांचा मोठा सहभाग होता. लोकसभेमध्ये ते 1952, 1957, व 1962 मध्ये निवडून आले व भारताचे पहिले कृषीमंत्री पद त्यांनी भूषविले. कृषकांचा कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी जगातील शेतकऱ्यांना संघटित व्हा हा मंत्र दिला. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आखून अमलात आणल्या.

भारतीय शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 1955 मध्ये ‘भारतकृषक समाजाची’ स्थापना केली. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषीक्षेत्रात तसेच शिक्षणक्षेत्रात केलेले कार्य शिक्षक, संस्थाचालक व बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांनी शेतकरी वर्गाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य केले. (Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi)

तर मित्रांना “Dr. Panjabrao Deshmukh Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “डॉ. पंजाबराव देशमुख निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment