एका बोटावरची शाई ची किंमत निबंध | Eka Botavarchi Shai chi Kimat

Eka Botavarchi Shai chi Kimat मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदान केवळ आपला अधिकार नसून एक जबाबदारीही आहे. देशभरातून मतदानाला सुरुवात झाली असून टप्पाही पार पडला आहे. परंतु मतदान करताना बोटाला शाई का लावतात? त्याचबरोबर ती शाई पुसता येते का?

असे प्रश्न अनेकांना पडत असतात.काही वर्षापूर्वी देशातील काही भागांत बोगस मतदान होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. हा गैरप्रकार रोखण्यासाठी या शाईचा उपयोग करण्यात आला.मतदाराने मतदान केले का नाही?

Eka Botavarchi Shai chi Kimat

याची योग्य माहिती मिळावी म्हणून तसेच मतदाराला दुसऱ्यांदा बोगस मतदान करण्यापासून रोखण्यासाठी सरकारकडून ही शक्कल लढवण्यात आली.

मतदानाची शाई कुठे तयार केली जाते?

मतदानासाठी विशेष शाई वापरण्याची युक्ती अंमलात आणण्याचं संपूर्ण श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.प्रथमता १९६२ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या शाईचा वापर करण्यात आला. यानंतर प्रत्येक निवडणुकीत या शाईचा वापर होऊ लागला.

ही शाई तयार करण्यासाठी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. ही शाई दक्षिण भारतातल्या ‘म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड'(MVPL)या कंपनीत तयार केली जाते.

१० एमएल शाईच्या एका बाटलीची किंमत १८३ रुपये एवढी आहे. ही शाई इतर कोणालाही विकत घेता येत नाही. MVPL द्वारे सरकारालाच ही शाई विकली जाते.

का पुसली जात नाही मतदानाची शाई?
मतदानाची शाई पुसता येत नाही. कारण या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते. ही शाई ४० सेकंदाच्या आत सुकून जाते.त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की, एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते.

यामुळे ही शाई बोटावरून काढता येत नाही. कमीत-कमी ७२ तासांपर्यंत ही शाई पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की, त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही.

 

का पुसली जात नाही मतदानाची शाई?

मतदानाची शाई पुसता येत नाही. कारण या शाईमध्ये सिल्व्हर नाय नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते.त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की, एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. यामुळे ही शाई बोटावरून काढता येत नाही.

शाई कीती तासापर्यंत पुसली जात नाही?

कमीत-कमी ७२ तासांपर्यंत ही शाई पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की, त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही.

Leave a comment