गणेश उत्सव निबंध मराठी मध्ये | Ganesh Utsav Nibandh in Marathi

Ganesh Utsav Nibandh in Marathi

Ganesh Utsav Nibandh in Marathi – मित्रांनो आज “गणेश उत्सव निबंध मराठी मध्ये” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Ganesh Utsav Nibandh in Marathi

गणेशोत्सव भारतामध्ये वर्षभर खूप उत्साहाने अनेक सण साजरे केले जातात. मग तो दहीहंडी असो, दिवाळी असो किंवा होळी असो, कि गणेशोत्सव असो. प्रत्येक सणाचे एक वेगळचं महत्त्व असते.

हे सण आपल्या जीवनात चैतन्य घेऊन येतात. पावसाळा ऋतूमध्ये येणारा गणेशोत्सव एक प्रमुख सण आहे. हा सण मराठी महिन्यानुसार भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य असे आहे की, परंपरागत चालत आलेल्या या सणाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक रूप दिले.

गणेश उत्सव निबंध मराठी

गणेशोत्सव हा उत्सव विदेशामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पण खास करून मुंबई, पुणे आणि कोकणात याची मजा काही औरच असते. सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. (Ganesh Utsav Nibandh in Marathi)

गणेशोत्सवाची तयारी ही खूप दिवस आधी चालू होते. भाद्रपद महिन्याच्य शुक्ल चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरी घेऊन येतात.

सुंदर सजव लेल्या गणपतीच्या मुर्त्या लोक डोक्यावरून तर काही लोक गाडीतून अगदी श्रद्धापूर्वक घरी आणतात.

हा देखील निबंध वाचा »  गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी | Guru Shishya Parampara Nibandh Marathi

Ganesh Utsav Nibandh in Marathi

सारेजण आपापल्या घरी सजावट केलेल्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. आणि अगदी मोठ्या तालासुरात “गणपती बाप्पा मोरया” या आवाजात सारा परिसर दुमदुमून जातो सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते. {Ganesh Utsav Nibandh in Marathi}

सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठे मोठे भव्य मंडप तयार करतात. या ठिकाणी सुंदर अशी विदयुत रोषणाई केली जाते.

सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मोठया आणि भव्य मूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीच्या आजूबाजूच्या जागेमध्ये पौराणिक गोष्टींचे देखावे तयार केले जातात.

गणेश उत्सव निबंध मराठी

ही गणेशोत्सव मंडळे सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करतात. काही ठिकाणी तर 10 फुलांची भव्य आरास केली जाते. Ganesh Utsav Nibandh in Marathi

या दिवसांत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सार्वजनिक ठिकाणी गमतीदार खेळ आयोजित केले जातात. लोकांच्या मनोरंजनासाठी पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन देखील गणेशोत्सव मंडळे करतात. गणेशोत्सवातील दिवसांमध्ये सायंकाळ च्या वेळेचे सौंदर्य पाहतच रहावेसे वाटते.

घराघरांत तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी श्रद्धने आणि भक्ती भावाने गणपतीची आरती केली जाते. त्यानंतर गोडधोड प्रसाद वाटला जातो. रात्री काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तर काही ठिकाणी भजन किर्तनाचे कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.

Ganesh Utsav Nibandh in Marathi

घराघरांमध्ये स्थापन केलेल्या गणपती मूर्त्यांचे काही जण दीड दिवसांनी तर काहीजण पाचव्या किंवा सातव्या दिवशी तलावात, नदीत किंवा समुद्रामध्ये विसर्जन करतात.

सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या मिरवणुका काढून विसर्जित केल्या जातात. सगळे लोक “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येऊन दर्शन देण्याची प्रार्थना करतात.

हा देखील निबंध वाचा »  जैवविविधता निबंध मराठी | Biodiversity Essay In Marathi

गणेश उत्सव निबंध मराठी

त्यावेळी सगळेजण आनंदाने नाचतात. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर या सणाची सांगता होते. गणेशोत्सव हा सण धार्मिक तर आहेच, पण त्याचबरोबर हा एक सामाजिक तसेच सांस्कृतिक उत्सव सुध्दा आहे. “Ganesh Utsav Nibandh in Marathi”

हा उत्सव लोकांना एकतेच्या सूत्रात बांधतो. गणपती विघ्नहर्ता आणि रिद्धी सिद्धीची देवता आहे. हा उत्सव साजरा करून जीवनाला सुख आणि समृद्धी लाभावी असे सर्वजण प्रार्थना करतात. अशाप्रकारे गणेशोत्सव सर्व लहानथोर मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

तर मित्रांना “Ganesh Utsav Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “गणेश उत्सव निबंध मराठी मध्ये” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात कुठे झाली?

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली.

किती साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचूरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली?

1894 साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचूरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top