गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी | Guru Shishya Parampara Nibandh Marathi

Guru Shishya Parampara Nibandh Marathi – मित्रांनो आज “गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Guru Shishya Parampara Nibandh Marathi

गुरू-शिष्य ही परंपरा आपल्याकडे फार प्राचीन आहे. पूर्वी मुलगा थोडा मोठा झाला, आठवे वर्ष लागले की त्याची मुंज करून त्याला गुरूकडे पाठवले जात असे.

मग बारा, चौदा वर्षे गुरुगृही राहून युवक झाल्यावर हा ज्ञानी छात्र घरी परतत असे व गृहस्थाश्रमाचा स्वीकार करत असे. तोवर गुरू हाच पिता, गुरुपत्नी हीच त्याची माता असे.

गुरुगृही ज्ञान संपादन करताना त्याला गुरुसेवा करावी लागे आणि गुरूचा निरोप घेताना त्याला गुरुदक्षिणाही दयावी लागे.

गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी

केवळ ज्ञान, न्याय, नीती या विदयांचा अभ्यास करताना गुरूची आवश्यकता असते असे नाही, तर चौसष्ठ कलांतील कोणतीही कला साध्य करतानाही गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असते.

संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांत यशस्वी ठरलेल्या कलावंतांनी नेहमी आपल्या गुरूचा गौरव केलेला आहे. आपल्याला अनेक थोर गुरूंच्या व त्यांच्या शिष्यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. ‘Guru Shishya Parampara Nibandh Marathi’

Guru Shishya Parampara Nibandh Marathi

धौम्य ऋषींचा शिष्य अरुणी याने गुरुआज्ञेचे पालन करून वाहणारे पाणी अडवण्यासाठी आपल्या शरीराचा बांध घातला. गुरुआज्ञा पूर्ण करण्यासाठी एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठा तोडून दिला.

त्यावेळी त्याने हा विचारही केला नाही की, यापुढे आपल्याला आपल्या धनुर्विदयेचा उपयोगही करता येणार नाही. गुरू रामकृष्ण परमहंसाच्या शिकवणीनुसार विवेकनंदांनी आपले सारे आयुष्य देशासाठी वेचले. महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानले होते.

भारतीय राजकारणात पडण्यापूर्वी आपल्या गुरूच्या सांगण्यानुसार त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास करून भारताची ओळख करून घेतली. Guru Shishya Parampara Nibandh Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी

असे हे गुरु-शिष्य. या सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ, साऱ्या जगाचे गुरू श्रीव्यास या जगाच्या आचार्याचे आपण दरवर्षी आषाढी पौर्णिमेला पूजन व स्मरण करतो.

तर मित्रांना “Guru Shishya Parampara Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

गुरु कोणाला म्हणतात?

आपल्याला ज्याच्याकडून ज्ञान मिळते त्याला गुरु म्हणतात.

Leave a comment