लता मंगेशकर निबंध मराठी | Lata Mangeshkar Nibandh in Marathi

Lata Mangeshkar Nibandh in Marathi – मित्रांनो आज “लता मंगेशकर निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांचा कर्णमधुर स्वर ज्याने ऐकला नाही असा भारतीय नागरीक शोधून सापडणे विरळच !

भारतच नव्हे तर भारतीय उपखंड तसेच दूरवर युरोप, अमेरिकेमध्ये त्यांची दिगंत कीर्ती पसरलेली आहे. २९ सप्टेंबर १९२८ रोजी मध्यप्रदेशातील इंदूर शहरात लता मंगेशकर नामक गानकोकिळा जन्माला आली.

Lata Mangeshkar Nibandh in Marathi

भारतामधील बहुतेक भाषांमध्ये तिने गाणी गायली आहेत. त्या भाषांमधील शब्दोच्चारांचा गोडवा अप्रतिम आहे. भावगीते, नाट्यगीते, सिनेगीते, अभंग, शास्त्रीय संगीत या व इतर प्रकारात त्यांनी गाणी गायली आहेत.

तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुतेक सर्व गायकांबरोबर व एकटीने विविध संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. या सर्व गाण्यांची संख्या तीस हजारांच्या आसपास आहे. ‘Lata Mangeshkar Nibandh in Marathi’

त्यांचे बाबा दीनानाथ मंगेशकर यांनी लावलेला हा वेल गगनापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यांच्या नाट्यसंस्थेत लताजींनी गायनाचा श्रीगणेशा गिरवला. जन्मजात मिळालेल्या दैवी स्वराचे त्यांनी अक्षरश: सोने केले.

लता मंगेशकर निबंध मराठी

लहान वयातच दीनानाथ मंगेशकरांचे अकाली निधन झाले. आई आणि आशा, मीना, उषा व हृदयनाथ या भावंडाच्या पालनपोषणाची जबाबदारी छोट्या लतावर येऊन पडली. गरीबीचे चटके आणि अपार दुःख झेलीतच त्यांचे बालपण गेले.

‘आयेगा आनेवाला’ या महल चित्रपटातील गाण्याने जगाला एक जादूई स्वर गवसला. लता मंगेशकर ही पार्श्वगायिका हिंदी चित्रपटात दिमाखदार पावले टाकीत पटावर आली आणि त्याच दिमाखात आज सहा दशके म्हणजे साठ वर्षानंतरही त्याच दिमाखात तुमच्या आमच्यासमोर उभी आहे. “Lata Mangeshkar Nibandh in Marathi”

अथक रियाजाने आपल्या गळ्यातील गंधार त्यांनी जपून ठेवला आहे. साऱ्या जगात प्रसिद्धी पावलेल्या लतादीदी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य करीत आहेत.

Lata Mangeshkar Nibandh in Marathi

त्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. त्यांना विविध देशातील महत्त्वाच्या शहरांचे सन्मान्य नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.

लतादीदींच्या स्वर्गीय आणि सुमधूर गाण्यांनी अनेक गाणी चिरंजीव झालेली आहेत. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे व अशी असंख्य गाणी वानगीदाखल उल्लेखिता येतील. इतके वैभव, कीती प्राप्त होऊनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.

लीनता, कोकिळकंठी स्वर आणि साधेपणा त्यांचे दर्शनानेच जाणवतो. मृत्यूसमयी योग्य व पुरेशा औषधोपचाराअभावी झालेल्या वडीलांच्या अंताची सल त्यांच्या मनात  जाचत होती. “Lata Mangeshkar Nibandh in Marathi”

लता मंगेशकर निबंध मराठी

परिणामी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाची संकल्पना पुढे आली आणि अल्पावधीतच मुर्तरूपाने साकारली. असंख्य रूग्ण या रूग्णालयात उपचार घेऊन बरे होतात. आणि लताजी व सर्व मंगेशकर कुटुंबाला व रूग्णालय परिवाराला दुवा देतात.

याउपर ते अन्य पुण्य कोणते ? दैवी देणगीचे सोने आणि दुर्लभ जन्माचे सार्थक यांचा प्रीतीसंगम लता मंगेशकरांच्या आयुष्यात आला आहे. किणकिणत्या घंटानादासम स्वर असलेल्या लता मंगेशकर ह्या भारताचे वैभव आहेत.

Lata Mangeshkar Nibandh in Marathi

भारतातील कर्तृत्ववान स्त्रीयांच्या यादीमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. सर्वानि त्या ‘भारतरत्न’ आहेत. युगानुयुगे हे अमररत्न लखलखत राहील, यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही.

तर मित्रांना “Lata Mangeshkar Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “लता मंगेशकर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

लता मंगेकर यांचा जन्म कधी अन् कोठे झाला?

लता मंगेशकर यांचा जन्म 29 सप्टेंबर 1928 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर शहरात झाला.

Leave a comment