माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध | Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi

Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi – मित्रांनो आज “माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi

बोलण्याची कला ही अशी कला आहे जी माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते. इतर प्राण्यांना ही माणसांप्रमाणे ज्ञानेंद्रिये आहेतच पण माणसाकडे असणारी बोलण्याची कला इतर प्राण्यांकडे नाही.

आपल्या भावना गरजा, मत व्यक्त करण्यासाठी माणसाला बोलण्याची क्षमता फारच उपयोगात पडते. आणि या क्षमतेचा वापर करायला माणूस विसरला तर मात्र त्याची फार मोठी गोची होईल.

मनुष्य हा समाजातील एकत्रितपणे राहणारा आहे म्हणजेच समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना काही अलिखीत नियमांचे पालन करावे लागते. बोलणे हा माणसाचा स्थायी भाव आहे हा स्वभावधर्म जर बदलण्याची वेळ आली तर मात्र फार मोठे संकट उभे राहील.

माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध

माणूस बोलणे विसरला तर पुन्हा आदिमानवाच्या काळासारखी परिस्थिती काही काळ निर्माण होईल. परत सिनेमामध्ये दाखवतात त्या पद्धतीने “झिंगालाला हू.. हू..” ची भाषा बोलावी लागेल. आताच्या जगात माणसाने जी प्रगती केलेली आहे.

ती सगळी एकमेकांशी साधलेल्या संवादाच्या आधारानेच केलेली आहे. हा संवाद साधण्याची कलाच माणूस जर विसरला तर माणसाच्या विकासाची गती देखील मंदावेल. आता अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टींना मर्यादा येतील. [Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi]

शिक्षण क्षेत्रामध्ये तर अमुलाग्र बदल करणे भागच आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद होऊ शकणार नाही. शब्दांची भाषा माणूस विसरल्यामुळे माणसाला शारीरिक किंवा सांकेतिक भाषेचा वापर करावा लागेल.

Manus Bolne Visarla Tar

अंध लोकांना शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने ब्रेल लिपीचा वापर केला जातो त्या पद्धतीनेच माणूस बोलणे विसरला तर एका विशिष्ट संवाद पद्धतीचा माणसाला अविष्कार करावा लागेल. संवादाची नवीन पद्धत शिकणे मध्ये माणसाचा बराच कालावधी जाईल आणि परिणामी विकास देखील मंदावेल.

एकमेकांची सुखदुःखे सांगण्यासाठी शाब्दिक भाषा नसल्यामुळे माणसाला शारीरिक पद्धतीने स्वतःचे मन व्यक्त करण्यामध्ये फार अडचणी येतील. प्रत्येक माणसाला जवळ कोणती तरी कला असते व एखादा छंद जोपासायला त्याला निश्चितच आवडते. गायन, वादन, नृत्य या सारख्या कलांमध्ये मनुष्य प्रगती करताना त्याला खूपच मर्यादा येतील. {Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi}

गायकांना गायन करता येईल. वादकांना वादनाचे बोल देखील सांगता येणार नाही. मग त्यांनाही हात वाऱ्यांची भाषा वापरावी लागेल. गायनाचा आनंद मात्र घेता येणार नाही आणि त्यामुळे सुंदर गाणे ऐकण्याचा योग ही जुळून येणार नाही.

माणूस बोलणे विसरला तर…

काही माणसं फारच गप्पिष्ट असतात अशा माणसांची मात्र फार मोठी तारांबळ उडेल. त्यांना भरपूर बोलावेसे वाटेल परंतु माणूस बोलणे विसरल्यामुळे त्यांचा काहीही इलाज चालणार नाही. लहान मुलांसाठी बालगीते देखील कुणाला गुणगुणता येणार नाही. मग मुलांना सांभाळणे देखील फारच कठीण होऊन जाईल.

संपूर्ण जगाची माहिती मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे टीव्ही मधील बातम्या या बातम्या देखील आपल्याला ऐकायला मिळणार नाही त्यामुळे जगात कुठे काय चालू आहे हे जाणून घेण्यात आपल्याला अडचणी येतील. “Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi”

माणूस बोलणे विसरला तर एक गोष्ट मात्र फारच चांगले होईल माणसामाणसांमध्ये होणारे कलह मोठ्या प्रमाणामध्ये थांबतील. माणसाला कुणाची निंदा करता येणार नाही. कुणाकडे चुगलीही करता येणार नाही त्यामुळे भांडणच होणार नाही. भांडणच झाली नाही तर सगळीकडे आनंद होऊन जाईल.

तर मित्रांना “Manus Bolne Visarla Tar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment