मराठी भाषेची थोरवी निबंध मराठी | Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi

Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi – मित्रांनो आज “मराठी भाषेची थोरवी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी”

खरच आपण सगळे भाग्यवान आहोत कारण मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. मराठी माणसाची खासियत अशी की तो हिन्दी संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजू बोलू शकतो. तसेच इंग्रजी बोलणे ही त्याला सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली गेली आहे. (Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi)

मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. त्यात विदर्भाची भाषा, कोकणी, मालवणी अश्या मराठी पूरक भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे.

13 व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला. त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. मुकुंदराज हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध कवी होते, त्यांनी “विवेक-सिद्धी” आणि “परममित्र ” ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत. “Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi”

मराठी भाषेची थोरवी निबंध मराठी

16 व्या शतकात संतकवी एकनाथ यांनी “एकनाथी भागवत” लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे. तसेच संत एकनाथांनी भारुडे सुद्धा लिहिले जी आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी सुमारे 3000 अभंग लिहिले. {Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi}

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला.

या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे. 9 व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. 20 व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला.

परंतु हल्लीच्या जमान्यात आपले अनेक संवाद हे जागतिक स्तरावर होत असल्या कारणाने लोक इग्रजीचा वापर फार करत चालले आहेत . मात्र मराठी माणसाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा या करता परिश्रम करणे सुरू केले आहे. आणि आता तर गूगल सारख्या नामवंत कंपनीला ही मराठी भाषेचे महत्त्व समजले आहे. [Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi]

तर मित्रांना “Marathi Bhashechi Thorvi Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मराठी भाषेची थोरवी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मराठी भाषेचे जनक कोण आहे?

मराठी भाषेचा अध्य प्रवर्तक महिणभट्ट ज्यांनी लीळा चरित्र लिहिले त्यांना मानतात.

मराठी राजभाषा आहे का?

मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे.

Leave a comment