माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Nibandh in Marathi

Mazi Aai Nibandh in Marathi – मित्रांनो आज आपण “माझी शाळा निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Mazi Aai Nibandh in Marathi
Mazi Aai Nibandh in Marathi

माता, आई हा प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. एक स्त्री बहीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, सहकारी अशा अनेक विविध नात्यांनी आपल्याशी जोडली जाते. प्रत्येक नात्याचा गोडवा वेगळा असतो पण मुळाशी असलेली भावना मात्र एकच ती म्हणजे मातृत्वाची!

स्त्रीमध्ये निसर्गत:च असलेली ही मातृत्वाची भावना तिचे वैशिष्ट्यही आहे आणि तिची शक्तीही. कारण मूल नुसते जन्माला घालून तिची जबाबदारी पूर्ण होत नाही. नाळ तोडल्यावर मूल वेगळे होते, पण आई मात्र मुलाशी एका अनामिक नाळेने जीवन भरासाठी जोडली जाते. आज आपण त्याच आईबद्ल मराठी मध्ये निबंध पाहणार आहोत- “Mazi Aai Nibandh in Marathi”

Mazi Aai Nibandh in Marathi

Mazi Aai Nibandh in Marathi माझी आवडती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द माझी आईच आहे. जन्माला आल्यापासून आईने जे काही माझ्यासाठी केले, जी काही मेहनत घेतली त्याला तोड नाही.

माझी आई निबंध मराठी
माझी आई निबंध मराठी

आईच्या बालपणीच्या जीवनातून आम्हा सर्व भावंडांना जीवन कसे जगावे, याची प्रेरणा मिळाली. माझ्या आईचे बालपण एका अतिशय मोठय कुटुंबात गेले. माझी आई मिळून एकूण पाच भावंडे होती. माझी आई जुन्या विचारांची होती. तिचे मुलीचे शिक्षण घेण्याच्या विरोधात विचार होते. Mazi Aai Nibandh in Marathi

आजी अडाणी होती. आजीच्या कडक वातावरणात आई मोठी होऊ लागली. आजी आईला शेतात कामाला आपल्यासोबत नेऊ लागली. पण आपल्या मुलीने शाळेत जावे, याबद्दल अवाक्षरही काढत नसे. आजोबा मुंबईत कुर्ल्याला एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होते. आईला शिकण्याची खूप इच्छा होती.

असेच एकदा आजोबा गावी सुट्टी घेऊन आले. सुट्टी संपल्यावर ते परत जात असताना आई त्यांना सोडवायला एस. टी. स्टॅण्डवर गेली. बस आल्यावर आजोबांच्या आधी आई बसमध्ये शिरली.

हे कोणाच्याही लक्षात आले नाही. बस सुरू झाली आणि आईचा गावाकडून शहराकडे प्रवास सुरू झाला. मुंबईत आल्यावर आई हट्टाने शाळेत जाऊ लागली. दुसरीपर्यंत शिक्षा झाल्यावर आई पुन्हा गावी आली.

माझी आई निबंध मराठी 10 ओळी

आजीचे न एकेता गावातल्या शाळेत जाऊ लागली. आपल्या खाऊचे पैसे वाचवून, सुट्टीत लिंबोळ्या विकून पैसे जमा करून त्यात आपले शिक्षण पूर्ण करू लागली. फी भरणे, पुस्तके घेणे हे सारे जमविले.

  • जर कधी आजीकडे पैसे मागितले तर आजी आईला म्हणायची, शाळा सोड अन् कामाला शेतात चल.
  • मग आई निराश न होता स्वत: काम करून मिळालेल्या पैशात त्यावेळची एस. एस. सी. ६० टक्क्यांनी पास जाली.
  • इतर वेळी गावातील लोकांची पत्रे वाचून दाखवणे, लिहून देणे, प्रसंगी शेतात काम करणे हे करत आई अकरावी देखील पास झाली. दुदैर्वाने आईला पुढे शिकता आले नाही.
  • घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्यामुळे आजोबा आईला शिकवू शकले नाही. आईचे शिक्षण होण्याचे स्वप्न तिथेच भंग पावले. तरीही आई हिंमत हरली नाही.
  • आईने शिवण क्लास लावला. तिथे इतर शिकाऊ मुलींना शिकवून आईने शिवण क्लास मोफत पूर्ण केला. तिथेही गुरुकृपा लाभली.
  • आम्ही ठाण्यात जेथे राहतो त्या भागातील ती सवोर्त्तम टेलर आहे, याचा मला अतिशय अभिमान आहे.
  • आईच्या जीवनातला हा संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देतो. शेवटी आई ही आईच असते.
  • तिचे उपकार थोर असतात. म्हणून मला माझी आई फार आवडते.

Mazi Aai Nibandh in Marathi

बाळाचे संगोपन आणि विकास घडवणारी आई स्वतःच प्रत्येक क्षणाला घडत जाते… विकसित होत जाते. मातृत्व क्षणिक नसते. रोपाला सातत्याने पाणी घालून, निगराणी करीत ते वाढवावे, तसे हे सातत्याने व जागरूकपणे करावे लागते.

त्यामुळे सध्या अनेक तरुणींच्या मनात आपल्याला मातृत्वाची जबाबदारी झेपेल का, आपले करिअर आणि मातृत्व हे एकमेकांच्या आड तर येणार नाही ना, अशी शंका घर करताना दिसत आहे.

याउलट, ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे, त्यापैकी कित्येक स्त्रिया बाळाच्या कल्याणाची जबाबदारी सर्वस्वी माझीच, मीच सगळे केले पाहिजे आणि तेही सर्वोत्तम पद्धतीने, असा विपरीत ताण घेताना दिसतात. परिणामी, सुपरवुमन होण्याची धडपड अनेक स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. Mazi Aai Nibandh in Marathi

या पार्श्वभूमीवर ‘माझी आई’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. श्री. द. मा. मिरासदार, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, श्री. शि. द. फडणीस, डॉ. यशवंत मनोहर यांसारख्या दिग्गजांचे जुन्या काळातील एकत्र कुटुंबातील जाणते बालपण, त्यांच्या आईची सजगवृत्ती, त्यांनी घेतलेले कष्ट यांचे प्रत्ययकारी चित्रण तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.

त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, महेश काळे, सखी गोखले, आर्या आंबेकर यांसारख्या तरुण पिढीतील सेलिब्रिटी प्रतिनिधींनी केलेले आईचे चित्रण तरुण पिढीची मातृत्वाकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी स्पष्ट करणारे आहे.

माझी आई निबंध मराठी

त्यामुळं म्हणतात न चुकलं की फटके देऊन सुधारणं हाच प्रघात होता. शाळांमध्येही तसंच असायचं. आई ही तशाच प्रकारे शिस्त लावायची. शिस्तीत वागणं, राहणं अशा बऱ्याच गोष्टी तिनं शिकवल्या. आई कडक शिस्तीची असली तरी तितकीच ती प्रेमळ होती. आमच्या घरात बहीण-भाऊ मिळून आम्ही सहाजणं होतो.  पुण्यात रेंजहिल्सला सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचो.

तिथून खडकी बाजार तीन किलोमीटरवर होता. तिथे बाजार भरायचा. आमच्या घरी घड्याळ नव्हतं, त्यामुळे आम्ही बाजारासाठी जाताना आई उंबऱ्याच्या बाहेर पाणी घालायची आणि ते वाळायच्या आत परत आलं पाहिजे असं म्हणायची, त्यामुळे आम्ही धावत जाऊन हव्या त्या वस्तू घेऊन यायचो.

बालवयात लागलेली ही सवय पुढं अंगवळणी पडली. मोठेपणीही कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी दहा मिनिटं आधी पोचलं पाहिजे, ही धारणा मनात पक्की झाली. आईच्या वागणुकीतूनही अनेक धडे मिळाले. रेजहिल्सला आम्ही राहायचो ती मिश्र वस्ती आहे. आमच्या घरी खूप महिला यायच्या. आई त्या सर्वांचं आनंदानं स्वागत करायची.

प्रेमाने विचारपूस करायची. वेगवेगळ्या जातिधर्मांच्या स्त्रिया आई च्या मैत्रिणी होत्या. त्यांना ती आपल्या ताटात जेवायला घालायची. कसलाही भेद नव्हता. माणसांशी नातं कसं जुळवायचं हे त्यातून आपसूकच शिकायला मिळालं. आई अतिशय प्रेमळ असली तरी रागावल्यावर कुणाचंही तिच्यापुढं चालायचं नाही. विशेषतः शिस्तीच्या बाबतीत तर ती अत्यंत कठोर होती; पण त्याचा फायदा आम्हा सर्वांना पुढील आयुष्यात झाला. Mazi Aai Nibandh in Marathi

Mazi Aai Nibandh

माझी आईशी अधिक जवळीक होती. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम सुरू झालं, ते माझ्या धाकट्या बहिणीचा तलाक झाल्यानंतर. आज या विषयाला होणारा विरोध कमी झाला आहे.

समाजामध्ये हळूहळू बदल होत चालला आहे; परंतु त्या काळी अक्षरशः मला घरातून बाहेर पडणं अशक्य व्हायचं. लोक दगड मारायचे, शिव्या द्यायचे, त्रास द्यायचे.

त्या वेळी आई त्यांना म्हणायची, “तो काहीच चुकीचे करत नाही. तुम्ही त्याच्याशी बोला.” थोडक्यात, अन्यायाच्या विरुद्ध उभी राहण्याची तिची ताकद होती. माझ्या कामाला तर तिचा सदैव पाठिंबा राहिला. बहिणीचा तलाक होईपर्यंत मी धार्मिक परंपरा कटाक्षाने पाळत होतो; परंतु त्या घटनेनंतर मात्र मी खडबडून जागा झालो. ती घटना तर मी आयुष्यात कधीही विसरू शकलो नाही.

माझी आई छानशी कविता

आई माझी महान, माझ्या यशाचीच फक्त तिला तहान,
आई माझे सर्वस्व, बापाचे तिच्यावर वर्चस्व,

तिची माझ्याकडून जी आशा,
कधिच करणार नाही मी तिची निराशा,

लेकरांसाठीच घातला जन्म तिने वाया
सर्वावश्च तिची अतुट माया,

रागावणे तिचे वाटे मला जिव घेणं
पण मायेचे दोन शब्द तिचे जसे अमृताचे थेंब

तिच्यामुळेच आहे जिवणाला या अर्थ
नाहीतर तिच्याविना सगळे जिवन आहे व्यर्थ

जन्मोजनी माझ्याहातून घडावी तिची सेवा
एवढेच वरदान मला, देरे माझ्या देवा

आई माझी सुर्याचा पहिला किरण
जिने प्रकाशिले क्षणोक्षणी माझे अंधारमय जिवन

आई माझी डोळयांतील अन्तुंची धार
सुख असो वा दुःख नाही साथ सोडणार

इवलासा काटा रुतता पायी, आठवतेजी आई

चार ओळींमध्ये महती तिची कोणीच सांगू शकत नाही.

शेवटी एवढीच इच्छा या मनाची
पुढच्या जन्मी पण आठवण राहो
आई सोबत घालवलेल्या प्रत्येक सुंदर क्षणाची

तर मित्रांना “Mazi Aai Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझी आई निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

कुटुंबात आईची भूमिका काय असते?

माता कुटुंबासाठी एक आदर्श वातावरण प्रदान करतात आणि प्रत्येकाच्या जीवनातील सर्वोत्तम आदर्श असतात. ती एक अशी व्यक्ती आहे ज्यावर कुटुंबातील प्रत्येकजण जीवनात पूर्णपणे अवलंबून राहू शकतो.

आपल्या मुलांना आरामदायी जीवन देण्यासाठी आई काय करते?

एक आई आपल्या मुलांना सुखकर जीवन देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते. ती आपल्या मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते आणि आयुष्यात कधीही हार मानू नका.

Leave a comment