माझी मायबोली निबंध मराठी | Mazi Mayboli Marathi Nibandh

Mazi Mayboli Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण “माझी मायबोली निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Mazi Mayboli Marathi Nibandh

27 फेब्रुवारी 1912 श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस हा जन्म दिवस! ते एक ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते त्यांना आमचा कोटी कोटी प्रणाम!

हा मराठी दिवस संपूर्ण मराठी जनतेला वाटणार दिवस कारण हा ‘जागतिक मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा आमची मायबोली. म्हणजेच मातृभाषा लहान मुलं जन्मल्यापासून आई जवळ असते. तेव्हा ती जी भाषा बोलते ती मुलाची भाषा होणे स्वभाविकच आहे.

मराठीच्या ‘म’ या अक्षरात ‘मी’, ‘माझी मराठी’, ‘मायबोली’ अशा या सर्व ‘म’कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व ‘म’ सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही म्हणतो, “मराठी असे मुची मायबोली’ इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. Mazi Mayboli Marathi Nibandh

महाराष्ट्राची प्रत्येक भाषा प्रत्येक प्रातांची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते.आपली मराठी भाषा हि संस्कृत भाषेतून आली आहे. तशा भारतातल्या अनेक भाषा संस्कृत भाषेतून आल्या आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची एक असली तरी ती दर बारा कोसावर बोलेली जाते.

माझी मायबोली मराठी निबंध

लेखी भाषा तीच असली तरी बोली भाषेत फरक पडतो. मराठी भाषेत सुद्धा असे वेगवेगळे प्रकार होतात. कोकणातील कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वरहाडी भाषा वेगळी मध्यप्रांतातील, मध्यप्रदेशातील हिंदी मिश्रित आणि गोव्या कडील कोकणी वेगळी असते.

अशी ही मराठी काळाच्या ओघात टिकून राहिल का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ नक्कीच राहणार. सात समुद्रापलीकडे असलेली पाश्चात्य भाषा आपण शिकतो कारण त्याचे विस्तारित क्षेत्र व सहज साध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो. परंतु पाश्चात्य भाषा आपल्याला शिकावी लागते तर मायबोली आपल्या रक्तात, तनामनात असते ज्यामुळे आपल्या संस्कारांचे पालनपोषण होते आणि आपल्या अस्तित्वाची ती खरी ओळख असते.

मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे, मराठीविषयी सुलभ ज्ञान देणे, मराठी भाषेला वैश्विक स्वरुप देते. समाजाला तिची उपयोगिता पटवून देणे तसेच विविध मराठी साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहोचवणे अशा अनेक गोष्टींनी भाषा टिकून राहते. इतकेच नही तर तिची प्रगती होते. त्यासाठी आपण मात्र प्रयत्नशील असावे. ‘Mazi Mayboli Marathi Nibandh’

Mazi Mayboli Marathi Nibandh

माझी मायबोली मराठी निबंध:- उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तरी हरकत नाही. पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका.

प्रत्येक मराठी माणसाला मराठी बोलता वाचता आली पाहीजे. आपल्या मराठीत सुद्धा खूप विषयावर लिखान झाले. शास्त्र, विज्ञान, ललित साहीत्य खूप आहे. परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ वि.दा.सावरकरांची आठवण ठेवा.

परंतु एक गोष्ट निश्चित जोपर्यंत आपल्याला आपल्या जन्मभूमी, कर्मभूमीची मनापासून ओढ-प्रेम वाटत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे. जेव्हा आपल्याल कोणी विचारले की “तुम्हाला तुमची भाषा नीट येते का?” याचे उत्तर “थोडी-थोडी येते!” असे आले तर मग तो आपल्याच अस्तित्वाचा अपमान असेल.

माझी मायबोली निबंध

मग अशावेळी अशा व्यक्तींकडून भाषेचा मान व तीचे अस्तित्व कसे राखले जाणार. म्हणूनच आपल्याला आपली ओळख व अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर भाषा टिकवणे-जपणे गरजेचे आहे.

तर मित्रांना “Mazi Mayboli Marathi Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझी मायबोली निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मराठी वर्णमालेत किती अक्षरे आहेत?

मराठी सहसा देवनागरी लिपीतील बालबोध प्रकारात लिहिली जाते, ज्यामध्ये 36 व्यंजन अक्षरे आणि 16 प्रारंभिक-स्वर अक्षरे असतात.

महाराष्ट्र भाषा कशी बोलली जाते?

महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी भाषा बोलली जाते.

Leave a comment