मी जिल्हाधिकारी झालो तर निबंध | Mi Jilhadhikari Zalo Tar

Mi Jilhadhikari Zalo Tar – मित्रांनो आज “मी जिल्हाधिकारी झालो तर निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mi Jilhadhikari Zalo Tar

विद्यार्थी दशेत असताना प्रत्येकाचं जीवनात काहीतरी बनण्याचं स्वप्न असतं. कुणाला नोकरी करायची असते, कुणाला व्यवसाय करायचा असतो, कुणाला असंख्य सेवांच्या क्षेत्रात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे करिअरही करायचं असतं ! शिक्षण, करियर आणि त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्या पायावरच व्यक्तीचं आयुष्य उभं राहतं असतं…

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या लोकशाही देशात आजही समाजसेवेला प्रचंड मोठा वाव आहे. आणि म्हणूनच समाजाची सेवा करून समाजसेवेचं व्रत्त धारण करण्यासाठी मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे…

मला याची जाणीव आहे की, भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले जिल्हाधिकारी पद मिळवण्यासाठी मला विद्यार्थी म्हणून आजपासूनच प्रचंड कष्ट मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील. एका संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैली, अनेक नामवंत जिल्हाधिकारी यांनी केलेले काम मला सतत प्रेरणा देत असते. “Mi Jilhadhikari Zalo Tar”

मी जिल्हाधिकारी झालो तर निबंध

खुणावत असते. आणि म्हणूनच मीही जिल्हाधिकारी झालो तर ….. संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करून विकासाचे काम शेवटच्या स्थानापर्यंत नेण्यासाठी आग्रही असेल. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यापासून तर त्या त्या जिल्ह्यामधील संस्कृती, तेथील परंपरा तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून जिल्ह्याला कोणत्या क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून मी संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

जिल्हाधिकारी म्हणून त्या जिल्ह्याच्या एकूणच विकास प्रक्रियेचा नेतृत्व मला करायचं आहे. त्यामुळे यापूर्वीच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून नव्या योजना विकसित करण्याचा प्रयत्न करेल. एका जिल्हाधिकाऱ्याला जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्व करावेलागते.

खरे तर हे सांघिक कार्य कौशल्य आहे. त्यामुळे मीजिल्ह्यातील समस्त लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि जनता यांच्यात समन्वय ठेवून लोकाभिमुख प्रशासनाची आखणी करेल. जिल्ह्यात बेरोजगारांसाठी तसेच कौशल्याधिष्ठित करिअर व शिक्षणासाठी नव्या प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी मी शासन स्तरावर ही पाठपुरावा करेल. {Mi Jilhadhikari Zalo Tar}

Mi Jilhadhikari Zalo Tar Nibandh

मी जिल्हाधिकारी झालो तर….. मला प्रचंड मोठं काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी लागेल पण तत्पूर्वी या पदावर पोहोचण्यासाठी मला दर्जेदार शिक्षण घेऊन त्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून भारतीय प्रशासकीय सेवेच्या सर्वोच्च परीक्षेत यश मिळवावे लागेल याची मला जाणीव आहे आणि त्यासाठी मी आजपासून निष्ठेने अभ्यास करेल आणि माझे स्वप्न पूर्ण करेल.

तर मित्रांना “Mi Jilhadhikari Zalo Tar” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मी जिल्हाधिकारी झालो तर निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment