मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी | Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi – मित्रांनो आज “मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

नमस्कार मिञांनो, ओळखलं का मला, अहो मी कोकणच्या श्रावणधारा, मीच हरिश्चंद्राचा कोकणकडा आणि मीच तव सातारचे कास पठार होय. राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी हे सर्व तर माझ्या छत्रछायेखाली आहेत.

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

भरपूर लोकांना मला भेटायला, माझ्या सान्निध्यात राहायला आवडत, पावसाळा सुरू झाला की, लोक, वन्यमित्र, छायाचित्रकार मला भेटायला येतात. बरोबर ओळखलंत मला ! होय तोच मी तुमचा लाडका सह्याद्री पर्वत. नमस्कार मित्रांनो, मी सह्याद्री. असे आश्चर्याने काय पाहताय ? हो मी सह्याद्रीच बोलतोय.

“नानारुपी झाडे फुले
किलबिलाट पक्ष्यांचा सतत तिथे,
घुमते आहे आजही नाव शिवबाचे,
चकाकते आहे जेथे तलवारीचे पाते॥’

हो, तोच मी…. सह्याद्री महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाचा एक अविभाज्य भाग आणि या महाराष्ट्राच्या महान इतिहासाचा मी एक साक्षीदार आहे. Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी

काळ्या पाषाणाच्या निधड्या छातीवर अनेक वर्षे घाव सहन करत आजही महाराष्ट्रभूमीला सुरक्षित ठेवणारा मी, आजही महाराष्ट्रभूमीला सुरक्षित ठेवणारा मी, तिच्या रक्षणार्थ झिजणारा मीच म्हणजे सह्याद्री.

नजाणे कित्येक प्रकारची झाडे, वृक्ष, वेली, कित्येक प्रकारचे पक्षी आणि प्राणी माझ्या कुशीत जन्मले, तेथेच निपजले. अन माझ्याच खुशीत मोठे झाले. निसर्गाची, या सृष्टीची कित्येक गुपिते मी माझ्या उरात कित्येक वर्षापासून जपून ठेवली आहेत.

हजारो जाती – प्रजातीचे वनस्पती, प्राणी, पक्षी, वेली म्हणजे माझे वैभव. हे वैभव अनेक संकटांचा सामना करत, न डगमगता निरंतर सांभाळत आजही मी दिमाखात उभा आहे. यातील कित्येक वृक्षांच्या प्रजाती तर अख्ख्या जगात कुठेही सापडत नाहीत. “Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi”

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

माझा हा दुर्गम प्रदेश माणसांपेक्षा या पक्षांनी, या प्राण्यांनी, या वृक्षांनी आपलासा केला. कित्येक नद्यांना माझ्या या काळ्या पाषाणातून पाझर फुटला.

भीमा, गोदावरी, कावेरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा आजही माझ्या महाराष्ट्रात खळाळून वाहत सर्वत्र आनंद पसरवत आहेत. माझे भूगोलातील स्थान तर अढळ होतेच, पण मला इतिहासात स्थान मिळवून दिले ते माझ्या स्वराज्य संस्थापकाने माझ्या छत्रपती शिवरायाने!

“कणकण तिथला देत आहे साक्ष
माझ्या शिवबाच्या इतिहासाची ॥
आहेत उमटलेली पावले तेथे
आजही मावळ्यांच्या पराक्रमाची,
त्यांच्या शौर्याची ॥

माझ्या शिवबाने त्याच्या पराक्रमाची गाथा माझ्या या काळ्या पाषाणावर गोंदली. माझ्या शिवबाने त्याच्या पराक्रमाची गाथा माझ्या या काळ्या पाषाणावर गोंदली. शिवबाच्या शौर्याने स्थापन झालेले स्वराज्य मी याचि देही याचि डोळा पाहिले. ‘Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi’

मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी

माझ्या शिवबाला साहाय्य करणारे कित्येक लढवय्ये, शिवरायांचे जिवलग मावळे माझ्या या कुशीत जन्मले आणि आपल्या शौर्याने त्यांनी माझ्या मस्तकात मानाचा तुरा रोवला. या सर्व वीरांच्या, मावळ्यांच्या रक्ताने माझी भूमी पावन झाली.

आपल्याच उदरी निपजलेल्या या शूरांना आपल्याच ओटीत स्वतःचा प्राण सोडताना पाहून काळजावर तितकेच कठोर घावही झाले, पण स्वराज्याचे स्वप्न जसे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने पाहिले होते तसे मीही पाहिले होते आणि ते या बलिदानांनीच साकार झालेले मी अनुभवले. या वीरांनी माझे नाव इतिहासात नोंदवले ते कायमचे.

मावळ्यांच्या माझ्या दऱ्याखोऱ्यातील केलेल्या गनिमी काव्याला साथ देत मीही स्वराज्य निर्मितीत खारीचा वाटा उचलला. एका समृद्ध काळाचा, एका विशाल स्वराज्याचा मी साक्षीदार बनलो. Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

पण आता…. वर्तमानात मात्र तुम्ही माझे सारे वैभव लुटू पाहताय. ज्या भूमीच्या रक्षणार्थ वीरांनी प्राण गमावले. त्याच भूमीला उजाड, ओसाड करून त्यावर उद्योगधंद, शहरे वसवून आजचा माणूस यशाचे झेंडे उभारत आहे.

स्वतःच्या स्वार्थापायी माझ्या अंगावर सुरूंग लावून मला स्वार्थापायी माझ्या अंगावर सुरूंग लावून मला जखमी करत आहे. मला दररोज रक्तबंबाळ करत आहेत माझ्यातून वाहणाऱ्या पवित्र नद्यांना तो दूषित करत आहे. नद्यांमध्ये विविध प्रकारच्या घाणीचे साम्राज्य पसरवत आहेत.

माझ्यात वाढणाऱ्या पशुपक्ष्यांच्या, वनस्पतींच्या कित्येक प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माझे वैभव मी गमावत चाललो आहे, पण मित्रांनो, शत्रूचे घाव निधड्या छातीने झेलणारा मी आपल्याच माणसांनी घातलेले घाव सहन करण्यास आता मात्र असमर्थ ठरत आहे. आज माझ्या अस्तित्वाचा, माझ्या दीर्घ इतिहासाचा लोकांना विसर पडत आहे.

माझी शान असलेले गड, किल्ले आज खचून कोसळत आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची जाण मात्र थोडक्यांनाच असावी ही दुःखाची बाब आहे. तुमचीही संपत्ती आहे. Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi

मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी

आज जगात जैवविविधतेचे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून मला ओळखले जाते, पण माझा हास होण्याचा वेग पाहता माझे भविष्य बिकट असल्याचे जाणवते. मी अस्तित्व विनाशाकडे वाटचाल करतय अस वाटतय. माझा इतिहास सतत होत आहे.

हे सारे थांबवणे तुमच्या हातात आहे. तुम्ही माझ्यात दडलेला, मुरलेला इतिहास शोधावा. तो वाचावा आणि तो जगावा असे मला मनापासून वाटते. मी महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुवर्णपान आहे. मला इतिहासात हरवू देऊ नका. जाता जाता मंडळी एकच सांगेन की,

भीती न आम्हां, तुझी मुळी ही,
गडगडणाऱ्या नभा!
अस्माना च्या सुलतानी ला,
जवाब देती जीभा!!
सह्याद्री चा सिंह गर्जतो,
शिव शंभो राजा !
दरी दरी तून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा !!

तर मित्रांना “Mi Sahyadri Boltoy Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मी सह्याद्री बोलतोय निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment