नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी | Nadiche Atmavrutta Nibandh Marathi

Nadiche Atmavrutta Nibandh Marathi

Nadiche Atmavrutta Nibandh Marathi – मित्रांनो आज “नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. मी नदी आहे.

मला सरिता, तटिनी, तरंगिणी सुदधा म्हणतात. माझा जन्म पर्वतात झाला. माझे बालपण डोंगर-दऱ्यांमध्ये हसत खेळत गेले. लहानपणी मी फार खोडकर होते कधीच एका जागी थांबत नव्हते परंतु हळुहळु मी मोठी झाली मैदानाच्या दिशेने वाटू लागली.

Nadiche Atmavrutta Nibandh Marathi

माझी गती स्थिर झाली. आज माझ्यावर आजू-बाजूंच्या गावांना, शहरांना पाणी देण्याची जबाबदारी आहे. लोक माझा वापर करून शेती करतात आपली उपजीविका भागवतात. जलसिंचनासाठी, बाग – बगीचे फुलवण्यासाठी माझ्याच पाण्याचा वापर होतो.

पूर्वी माझे पाणी प्यायले जायचे. माझ्या पाण्याला पवित्र मानले जायचे. परंतु मानवाने माझे पाणी दूषित केले आहे. माझ्या किनाऱ्यावर भांडी घासणे, कपडे धुणे, पशु पक्ष्यांची अंघोळ घालणे या सर्व गोष्टी मुळे माझे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. “Nadiche Atmavrutta Nibandh Marathi”

एवढेच नव्हे तर माझ्यात कारखान्यातील सांडपाणी, शहरातील कचरा सुद्धा टाकला जातो. मनुष्य आपल्या सुख-सोईसाठी माझा गैरवापर करू लागला आहे. माझा प्रवाह रोखल्यामुळे आणि जलप्रदूषणामुळे मी दूषित झाले आहे.

नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी

नेहमी वाहत राहणे आणि सर्वांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. मनुष्य कितीही माझ्या विरोधात असल तरी मी आयुष्यभर मानवजातीची सेवा करणार. माझ्यामुळे  सर्वांचे कल्याण होते यातच मी समाधानी आहे.

हा देखील निबंध वाचा »  शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी | Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

” सरिता करिते का कधी खंत ? असे तुम्ही माणसे माझे कौतूक करता; पण आता खरोखरच माझ्यावर खंत करण्याची वेळ आली आहे. हे पाहा तुम्ही काय आणलयं पिशवीतून ? ‘ निर्माल्य ‘ ते ग्रामसफाई कामगार सगळ्या गावाचा कचरा आणून माझ्यात टाकतात. Nadiche Atmavrutta Nibandh Marathi

गावातले सगळे गवळी त्यांच्या गुरांना डुंबण्यासाठी माझ्या स्वाधीन करतात . गावात येणारे ट्रक्स, गावातील रिक्षा, टांगे येथेच धुतले जातात. मग सांगा, माझे पाणी कसे स्वच्छ राहणार ? तुम्ही येथे येता आणि नाके मुरडता, ‘किती घाण हे नदीचे पाणी तुमच्यासाठी हे स्वच्छ मधुर पाणी घेऊन मी किती दुरून चालत आले .

Nadiche Atmavrutta Nibandh Marathi

चालत कसली, अगदी धावत आले . माझ्या बाबांचे – पर्वतराजाचे घर सोडताना मी क्षणभरही थबकले नाही. कारण मला तुमच्याकडे येण्याची ओढ लागली होती जीवन माझ्याजवळ जे जे काही चांगले होते, ते ते तुम्हांला दयायचे होते.

मी तुम्हांला दिलेच, पण मी वाहून आणलेल्या गाळाने माझ्या काठची तुर्मची जमीन सुपीक बनवली त्यामुळेच तुमची शेते बहरली. तुमच्या बागा फुलल्या . तुम्ही पण कृतज्ञतेने माझ्या काठावरती घाट व मंदिरे बांधलीत .

आजकाल तुम्ही माणसे मला अस्वच्छ करत आहात. उपकारकर्त्याला तुम्ही विसरला आहात . केव्हा केव्हा असा राग येतो. वाटते, मोठा पूर यावा. आणि ही बेइमान माणसे, गावे यांना जलसमाधी दयावी.

तर मित्रांना  “नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हा देखील निबंध वाचा »  क्रिसमस / नाताळ निबंध मराठी | Natal Nibandh in Marathi

मित्रांनो, तुमच्याकडे “Nadiche Atmavrutta Nibandh Marathi”  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

 

2 thoughts on “नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी | Nadiche Atmavrutta Nibandh Marathi”

  1. Pingback: आरसा नसता तर निबंध मराठी | Aarsa Nasta Tr Nibandh Marathi - निबंध मराठी

  2. Pingback: आरसा नसता तर निबंध मराठी | Aarsa Nasta Tar Nibandh Marathi - निबंध मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top