नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

Nag Panchami Nibandh Marathi – मित्रांनो आज “नागपंचमी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Nag Panchami Nibandh Marathi

नागपंचमीचा सण झालं अधीर हे मन
वारुळाला जाऊया गं
नागराजाला बाई गं
दुध दह्या वाहू दया गं…….

सर्व स्त्रिया व मुली यांना हवाहवासा वाटणारा सण म्हणजे ‘नागपंचमी’ श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असतो. हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येतो. आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे

नागपंचमी निबंध मराठी

सुंदर रूप आपल्याला पहायला मिळते. ऊन पावसाच्या खेळाचा हा महिना, कधी कधी आभाळ मेघांनी पूर्ण झाकोळून जाते तर कधी लखलखीत ऊन पडते.

तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते. असा हा श्रावण महिना फुलांप्रमाणेच विविध सणांनीही सजून आलेला दिसतो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. यादिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

Nag Panchami Nibandh Marathi

नागपंचमीचा सण बहिणभावाचे नाते सांगणारा असतो. अनेक स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात. कृषिसंस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे.

नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आहेत कारण उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते व धान्योत्पादन वाढते. म्हणून ते शेतकरी बांधवांचे मित्र मानले जातात. यादिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात.

नवीन वस्त्रे, अलंकार घालून नागप्रतिमेची दूध, लाल्या, आघाडा वाहून पूजा करतात. स्त्रिया वा मुली यादिवशी गावाबाहेर जाऊन वारूळाची वा मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात.

नागपंचमी निबंध मराठी

फेर धरून गाणी गाणे, झोपाळे बांधन झोके घेणे, झिम्मा-फुगडी, पिंगा इत्यादी विविध खेळ खेळून स्त्रिया आपले मन मोकळे करतात.

चल गं सये वारुळाला वारुळाला,
नागोबाला पूजायाला पूजायाला j
ताज्या लाट्या वेचायाला वेचायाला,
हळदकुंकू वाहायाला वाहायाला।।

Nag Panchami Nibandh Marathi

हे लोकगीत गाताना दिसतात. अशाप्रकारे नागपंचमीचा सण भक्तिभावाने आणि श्रध्देने साजरा केला जातो, साप, नाग हे निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहेत. परंतु त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची भीती असते.

अर्थात याला कारणीभूत आहेत ते सापांविषयी जागांविषयी प्रत्येकाच्या मनात असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा. शाळा, महाविध्यालय येथे जाऊन साप, नाग इत्यादी प्राण्यांविषयी लोकांच्या मनातील भीती घालवून जनजागृती करणे गरजेचे आहे.

तर मित्रांना “Nag Panchami Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “नागपंचमी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

प्रसिद्ध आठ नागांची नावे सांगा.

पहिला अनंत, दुसरा वासुकी, तिसरा पद्म, चौथा महापद्म, पाचवा तक्षक, सहावा कारकोटक, सातवा शंख आठवा कुलिक किंवा कालिया.

पंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया कोणासाठी उपवास करतात आणि का?

नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात, भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे.

Leave a comment