ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Shikshan Nibandh

Online Shikshan Marathi –  मित्रांनो आज आपण ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Online Shikshan Nibandh

आता सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे म्हणून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. आपल्या राज्य शासनाच्या या धोरणानुसारच आज आपण ऑनलाइन एज्युकेशन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू तर केली आहे, मात्र याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक प्रचंड गोंधळून गेले आहेत.

कारण सर्व जन पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे खरोखरच ऑनलाइन शिक्षण पद्धती ही पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय ठरू शकते का नाही? यावर विचार करून त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही विचार करणे खूपच आवश्यक आहे.

कोविड१९ कोरोना विषाणूने आपल्या प्रत्येकाच्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आपल्याला हवे किंवा नको असलेले खूप सारे मोठे बदल आपल्या आयुष्यात होत आहेत. online shikshan marathi nibandh

ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध

जसे कि वर्क फ्रॉम होम, संस्कृती, स्वच्छतेचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरतानाचे नियम हे सर्व आपल्या अंग वळणी पडत चालले आहे.

माणसाची जीवनशैली बदलली. प्रत्येकातच वैचारिक, व्यावहारिक, शैक्षणिक, मानसिक सगळ्याच स्वरूपाचे बदल झालेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाइन शिक्षण!

आपल्या सर्वांचा शिक्षणाचा उद्देश म्हणजेच चहु बाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व व आपल्या पायावर उभे राहणे आणि स्वताला घडवणे हा आहे.

Online Shikshan Marathi Nibandh

यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होऊ शकतो तेवढा अन्य कशाचाही होऊ शकत नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे विकासाचे पुढचे पाऊल टाकले जाऊन विद्यार्थी व शिक्षकांसाठी ज्ञानाचे भांडार उघडले गेले आहे. झूम, गुगल मीट, क्लास रूम आणि काहीजण व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने शिकवण्याची ही प्रक्रिया राबवत आहेत.

नवीन काहीतरी शिकायला मिळणार म्हणून एक जिज्ञासा, कुतूहल आणि नावीन्य पूर्ण तंत्रज्ञानयुक्त पद्धत सुरुवातीला खूप छान व परिस्थितीनुरूप सोयिस्कर देखील मानण्यात आली. कदाचित शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही ही वर्क फ्रॉम होमची ऑनलाइन एज्युकेशन पद्धत आवडली असेल ही, पण हे डिजिटल शिक्षण कायमस्वरूपी इलाज होऊ शकते का? आताच्या अडचणीच्या काळात एक पर्यायी उपलब्धता म्हणून स्वीकारलेली ती एक पद्धत आहे. online shikshan marathi nibandh

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक विकासदेखील खूप महत्त्वाचा आहे. तो आपण ऑनलाइन शिक्षणामध्ये देऊ शकतो का? आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही बनले पाहिजे ही काळाची गरज आहे. असे खूप प्रश्न उपलब्ध होतात.

ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता

कोविड-19 कोरोना चा कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी व शिक्षक ऑनलाइन संवाद साधू लागले आहेत. शिक्षक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक काळातील शिक्षक बनत आहेत.

शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षकांचे उत्तम शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना पण सुद्धा मिळू लागले आहे. मुलगा ऑनलाइन अभ्यास करतो आहे की नाही यावर पालक लक्ष ठेवू लागले आहेत . मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे याऐवजी मुले ऑनलाइन अध्ययनात व्यस्त झाली. {Online Shikshan Marathi }

ऑनलाईन शिक्षणाची नकारात्मकता

विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या भरपूर शैली आहेत. यामध्ये बसून, ऐकून, स्पष्ट करून आणि कृतीतून शिकण्याचा समावेश आहे. परंतु विद्यार्थी 80-90% टक्के अनुभवातून शिकत असतो तो अनुभव या पद्धतीमुळे घेता येत नाही. शिक्षक व विद्यार्थी या दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद होत नाही त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत.

दुसरी मोठी समस्या म्हणजे या शिक्षण पद्धतीसाठी लागणारे मोबाईल, संगणक ही साधने. अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल, संगणक यापैकी कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेटवर्क सर्वांकडे उपलब्ध आहेच असे नाही. अनेक ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्यामुळे व्हिडीओ डाऊनलोड करणे, ऑनलाइन लिंक ओपन होत नाहीत.

मोबाईल, लॅपटॉप, संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळ्यांचे व कानांचे विकार तसेच पाठदुखी असे आजार उद्भवू शकतात. यावरून असे दिसून येते कि ऑनलाईन शिक्षण पेक्षा समोर समोर द्यान घेण कधीही चांगले.

तर मित्रांना “Online Shikshan Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व काय आहे?

आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हे आवश्यक साधन आहे. शिक्षणाच्या या साधनाचा वापर करून आपण जीवनात काहीही चांगले साध्य करू शकतो.

ऑनलाइन शिक्षण किती उपयुक्त आहे?

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना आता अभ्यासात जितका वेळ द्यावा लागत होता तितका वेळ शाळेत घालवावा लागत नाही. त्यांचा वेळ वाचतो.

Leave a comment