पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी | Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi – मित्रांनो आज “पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे अतिशय सधन, सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूपराणी होय.

मोतीलाल नेहरू हे श्रेष्ठ दर्जाचे वकील होते. त्यांचे घराणे काश्मिरी पंडितांचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. ब्रिटनमधील हैरो येथे शिक्षणसाठी गेले.

बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात परत आले व त्यांचा 1916 मध्ये काश्मिरी ब्राम्हण कुटूंबातील कमलाशी विवाह झाला. Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी

1912 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात आले व अलाहाबाद येथे वकिली सुरू केली पण लवकरच ते राजकारणात आले.

त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी जास्त सहवास आल्यामुळे गांधीचे विचार त्यांना पटू लागले. तेंव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधीजींना आपले गुरू करून घेतले.

1920 ची असहकार चळवळ, 1930 ची सविनय कायदेभंगाची चळवळ यात पं. जवाहरलाल नेहरूंनी सक्रीय सहभाग नोंदविला. 1923 मध्ये त्यांनी भारतीय जनतेला सांगितले.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

‘स्वदेशीचा वापर करावा, विदेशी कपडे वापरू नका.’ याबाबत विदेशी कापडाच्या दुकानासमोर धरणे धरले तेंव्हा त्यांना ब्रिटीशांनी अटक केली. या कारणाबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला.

भारतीय राजकारणावर 1920 नंतरच्या काळात महात्मा गांधिजींचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतानाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक वलय, वेगळे स्थान निर्माण केले. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडायची. Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

मुलांसाठी ते फक्त चाचा नेहरू होत. आजचे बालक हे उद्यान नागरिक आहेत, पालक आहेत. म्हणून त्यांच्याकडे खूप आशावादी नजरेने ते पहायचे.

पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी

त्यांना या वयातच चांगले संस्कार कसे देता येतील याचाच विचार करायचे. कारण आजच्या बालकावरच उद्याचे भवितव्य अवलंबून आहे. {Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi}

म्हणूनच चाचा नेहरू हे नेहमी लहान मुलांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतांना दिसायचे. चाचा नेहरू हे फक्त भारत देशातील बालकांवरच प्रेम करत नव्हते तर परदेशातील बालकांवरही प्रेम करायचे.

चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल फार आवडायचे. पंडित जवाहरलाल नेहरू 1955 मध्ये रशियाला गेले होते. त्या ठिकाणचा एक छोटा बालक चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल देण्याचा प्रयत्न करत होता.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

पंडित नेहरू हे उंचावर असल्यामुळे तो बालक त्यांना फुल देऊ शकत नव्हता. तेंव्हा तो पडल्याबरोबर चाचा नेहरू खाली उतरले व त्या बालकाजवळचे गुलाबाचे फुल घेतले व त्यालाही उचलून घेतले व म्हणाले, “बाळ मी मोठा नाही, उद्याचे जग पाहणार आणि त्यात वावरणारा तूच माझ्यापेक्षा मोठा आहेस.”

आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी उंच उचलून म्हंटले, ” पहा रे मुलांनो, आता कोण मोठा आहे”. त्यावेळी तेथील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात चाचा नेहरू व त्या मुलांवर गुलाबांच्या फुलांचा वर्षाव केला. Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू जपानला गेले तेंव्हा त्यांना एका छोट्या मुलाने विचारले, “चाचा नेहरूजी हत्ती कसा दिसतो?” त्यावर नेहरूनी जपानला खराखूरा हत्ती भेट म्हणून पाठविला. यावरून त्यांचे बालकावरचे प्रेम किती होते? याची जाणीव होते.

पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी

1954 मध्ये भारत आणि चीन यांच्यात करार होऊन पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला. जगातील सार्वभौम राष्ट्रांनी परस्परांशी कशा प्रकारे सन्मानपूर्वक व्यवहार करावा यासंबंधी मार्गदर्शन करणारी तत्त्वे म्हणजे पंचशील तत्त्वे होत.

दोन देशात जो करार झाला. त्यात भारतातर्फे पंडित जवाहरलाल नेहरू व चीनतर्फे चो. एन. लाय. यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. ही तत्त्वे परस्परांच्या क्षेत्रीय अखंडतेचा व राजकीय स्वातंत्र्याचा सन्मान करते. “Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi”

परस्परांवर आक्रमन करने, अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप न करणे. राष्ट्रीय समानता व परपस्परांचे हीत जोपासते व शांततामय सहजीवन व आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्विकार करते याप्रमाणे ही पंचशील तत्वे सर्व राष्ट्रांनी आत्मसात करावी, यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

दोन राष्ट्रांत समानता, शांतता, एकात्मता निर्माण करण्यासाठी ही तत्वे मार्गदर्शन करतात. पण 1962 मध्ये चीननेच भारतावर आक्रमण केले आणि ही तत्वे फोल ठरली.

भारतीय समाजाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना समाजात बेकारी, दारिद्र्य, उपासमार, गुलामगिरी इ. समस्या मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असलेल्या दिसून आल्या.

तेंव्हा या समस्या सोडवायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे समाजवाद होय. हे नेहरूनी शोधले. नेहरूंचा समाजवाद होता. दारिद्र संपवून जनतेला समृद्ध जीवन जगता यावे हे त्यांच्या समाजवादाचा मुख्य उद्देश होता.

पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी

31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली.

डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला.

8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांना तुरुंगवास घडला. [Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi]

जानेवारी 1945 मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 1951 ते 1954 पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची जोपासना करणारा भारत निर्माण करणे, हे नेहरूंचे स्वप्न होते. ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असतानाच ते समाजवादाकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला.

1942 च्या स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी कॉंग्रेसने, ‘ब्रिटीशांनो चालते व्हा असा ठराव संमत करून घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या कॉंग्रेसच्या ठरावात महात्मा गांधीनी जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

तसेच ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ असे निक्षून सांगितले. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटीशांना ‘छोडो भारत’ हा संदेश दिला. त्यावेळी या संदेशामुळे भारत देशातील सर्वच प्रांतातून जनता सर्व ताकतीने स्वातंत्र्यलढ्यास तयार झाली. Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी

यात पंडित नेहरूंनी प्रमुख भुमिका बजावल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना पकडून अहमदनगरच्या कारावासात बंदिस्त केले. सर्वच प्रांतातून ब्रिटीशांना होत असलेला विरोध पाहून 3 जून 1947 ला लॉर्ड माऊंटबेटन यांनी फाळणीची ऐतिहासिक योजना सादर केली.

लॉर्ड माऊंटबेटन बॅ. जिनांना पाकिस्तानच्या मागणीपासून परावृत्त करू शकले नाहीत. तेंव्हा कॉंग्रेस पक्षाने संघर्ष टाळावा म्हणून फाळणीची योजना मान्य केली. Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

तेंव्हा जुलै 1947 मध्ये ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. त्यानुसार भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1947 हा दिवस ठरला. आणि अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले. व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाला.

Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

अशा प्रकारे नेहरूंनी आपल्या विचारातून जगाला शांतीच्या मार्गाने जाण्यास सांगितले म्हणूनच त्यांना ‘शांतीदूत’ असे संबोधले जाते.

वंशवाद, साम्राज्यवादाला विरोध दर्शवून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अलिप्तवादी धोरणांचा अवलंब करावा हे सर्वांना सांगितले. म्हणूनच त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असेही म्हटले जाते.

तर मित्रांना “Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी”  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे अतिशय सधन, सुसंस्कृत घराण्यात झाला.

पंडित नेहरू यांना अटक का झाली?

31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली.

पंडित नेहरू यांनी भारत छोडो संकल्प कधी सोडला?

7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला.

Leave a comment