pani hech jivan nibandh in marathi मित्रांनो आज आपण पाणी हेच जीवन निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
निबंध मराठी
पाणी हेच जीवन
‘Pani Hech Jivan Nibandh in Marathi पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे या वाक्यावरून पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवते.
कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.
पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदा सर्वकाळ योग्य व पुरसे ठेवावे लागते.
शरीरातील पाण्याच प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही.
मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जीवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसापेक्षा जास्त दिवस तो जगूच शकत नाही.
मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे.
औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जा निर्मिती साठी पाणी हेच माध्यम आहे.

शेती करण्याकरता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे..
दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड,
जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी ची टंचाई जाणवत आहे. व हा एक
गंभीर मुद्दा बनला आहे. आणि पाणी टंचाई चा प्रश्न मनुष्यच सोडवू शकतो. जर प्रत्येक व्यक्ती पाण्याचे महत्व समजून त्याचा सांभाळून उपयोग करेल तर मग कधीही
पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे.
Pani Hech Jivan Poem in Marathi
पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू…
आता उरले आहे कुठे पाणी.. ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही, ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी.. शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी.. गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी... पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी.. शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी, पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी.. आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला, चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी..
Pani Hech Jivan Nibandh in Marathi
पृथ्वी वरील पाणी ही निसर्गाच्या अनमोल भेटीं पैकी एक आहे. मानवी शरीरात सुमारे तिसरा भाग पाण्याचा आहे, जो आपल्या जीवनात पाणी असल्याचे सिद्ध करतो.
पाण्याचे महत्त्व काय आहे?
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राण्याला पाण्याची गरज आहे झाडे आणि वनस्पतींनाही पाण्याची गरज आहे, म्हणूनच असे म्हणतात की पाण्याशिवाय जीवन नाही.



पाणी सहसा समुद्र, तलाव, विहिरी, तलाव आणि कालवे इत्यादींमध्ये आढळते.
समुद्र त्यातले पाणी आपल्यासाठी पिण्यास योग्य नाही कारण हे पाणी बहुधा खारट आहे.
हे पाणी शुद्ध करणे शास्त्रोक्त पद्धतीने पिण्यासारखे कसे होईल याचा दररोज नवीन प्रयोग करत आहेत. आपले जीवन पाण्यावर अवलंबून आहे.
पाणी आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांना माहित आहे.
आपल्या साठी पाण्याची किंमत जाणून कशी आहे हे समजते, देशातील काही भाग असे आहेत की येथे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळवणे फार कठीण काम आहे.
जरी आम्हाला ते मिळालं तरी, अशा परिस्थितीत, ते मैलांपासून दूर जातात आणि ज्यामध्ये त्यांचे पाणी मिळते.
पाणी हेच जीवन निबंध मराठी
पाणी आणण्यात अर्धा दिवस घालवला जातो. दुसर्या बाजूला वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस पाण्याचा वापर वाढत आहे ज्यामुळे लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.
म्हणूनच आज आपल्याला एक थेंब पाणी वाचवण्याची जितकी आवश्यकता आहे. आपण पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे पाणी आडवा पाणी जिरवा.
तर मित्रांना तुम्हाला “pani hech jivan nibandh in marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे पाणी हेच जीवन निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. ती कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – [email protected]
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
Pingback: सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar - निबंध मराठी
Pingback: माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand - निबंध मराठी
Pingback: वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी | Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi - निबंध मराठी