पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी | Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh – मित्रांनो आज “पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

पर्यावरण व मानव यांचे अतूट नाते आहे. मानवाबरोबरच सर्व सजीव सृष्टी पर्यावरणाशी या- ना- त्या नात्याने जुळलेली आहे. निसर्गातील हवा, पाणी, वृक्ष- वनस्पती, जमीन, पशु-पक्षी आणि मानव प्राणी , यांच्या नात्यात जेव्हा नैसर्गिक समतोल असतो…. तेव्हा पर्यावरण संतुलित आहे, असे म्हणतात.

नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा असल्याने तो आपण पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित जतन करून ठेवणे गरजेचे आहे. नव्हे आपली ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे! Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

मानवाच्या अति हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास होत आहे. आणि त्याला आपण विकास म्हणतो आहोत, परंतु आपल्याला हे कळत नाही की आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या मार्गावर चालत आहोत.

पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी

निसर्गाचं चक्र असंतुलित होण्याला माणसाचा ‘स्वार्थ आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. पर्यावरणातील मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षोपामुळे विविध पर्यावरणीय समस्या आज आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

आज आपल्या जीवनातील खुपच दुःखदायक गोष्ट म्हणजे निसर्ग आपल्या पासुन दुरावत चालला आहे. कृत्रिम विकासामुळे “माझं आणि निसर्गाचं अनमोल नातं “ तुटत चाललेलं आहे.

हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं! कारखान्यातून होणारे जल प्रदूषण, वायू प्रदूषण नवनवीन रोगांना आमंत्रण देत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणीय संतुलन . अबाधित ठेवणे अवघड जात आहे. “Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh”

Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

शहरांत सांडपाण्याचा, घन-कचऱ्याचा व प्लास्टिकचा प्रश्न गंभीर बनतो आहे. कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश आवाज, वाहने ध्वनिप्रदूषण वाढवत आहेत. ज्या नदीला आपण जीवनवाहिनी म्हणतो.

त्या सर्व नद्या आज सर्व प्रकारचा कचरा वाहून नेणाऱ्या गटारगंगा बनवत आहेत. वाढते जलप्रदूषण पर्यावरणाला मारक ठरत आहे. वृक्षतोडीमुळे प्राण्यांची नैसर्गिक निवासस्थाने धोक्यात आली आहेत.

बिबट्यासारखे जंगली प्राणी जेव्हा थेट शहरी रस्त्यावर येऊन थडकतात, तेव्हा पर्यावरणाचा न्हास आता कोणत्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे, हे लक्षात येते. (Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh)

पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी

औद्योगिकरण, शहरीकरण, कारखानदारी, बाहने यांच्यामुळे वायु, जल, ध्वनी व भुमी प्रदुषण वाढते आणि मग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे, चळवळ सुरू करणे काळाची गरज बनते.

आज पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येकाचा खरा सहभागच निसर्गचक्राला वाचवू शकतो.

झाडे लावणे, प्रदूषण रोखणे, प्लास्टिकचा वापर थांबवणे, जंगलांचे रक्षण करणे, हे आपल्या हिताचे आहे. आपली संस्कृती ही परंपरांनी नटलेली आहे. गंगेला आपण पवित्र मानतो. पण तेच गंगेचं पाणी पिण्यायोग्य ठेवत नाहीत. “Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh”

Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

सांडपाणी, गटारीचे पाणी घाण करून हे पाणी प्रदूषित झाले आहे. म्हणून चला पृथ्वीला विनाशापासून वाचवू या. योग्य विचार करून पर्यावरण पूरक कृतीच आपल्याला विनाशापासून वाचवू शकतील……

“पर्यावरण वाचवू या !!
मानव जातीला जगवू या
सृष्टीचा चराचराला …
प्रदूषणमुक्त करू या!!”

तर मित्रांना हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment