पेट्रोल संपले तर निबंध मराठी | Petrol Sample Tar Marathi Nibandh

Petrol Sample Tar Marathi Nibandh

petrol sample tar marathi nibandh –  मित्रांनो आज आपण “पेट्रोल संपले तर निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Petrol Sample Tar Marathi Nibandh

आज आपण पाहतोय पेट्रोलचे भाव एकदम वाढतच चालले आहेत म्हणून आपण भरपूर बातम्या मध्ये पहिले असेल प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात. लोकांनी आपला राग व्यक्त करून घेतला. काही लोकांनी सूर लावला की पृथ्वीवरचे पेट्रोल आता संपत आले आहे. फार दिवस पुरणार नाही.

शिवाय त्याचे भाव आता वाढतच जाणार. आता ते 100 रुपये लिटर देखील झाले आहे अस बोलयला काही हरकत नाही. पण पेट्रोल जपून वापरायला हवे. मी देखील यावर खूप गंभीरपणे विचार करायचा प्रयत्न केला आणि मला तेव्हा त्या मंथनातून काही निष्कर्ष हाती आले ते खालीलप्रमाणे.

पुढच्या वेळी भाववाढ करताना आधी पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर केले जाईल. मग लोक त्यावर वाचकांच्या पत्रव्यवहारात निषेधाची पत्रे लिहितील. चाकरमानी लोक कचेरीच्या वेळेत फेसबुकवर, Watsapp, youtube Video च्या साह्याने विनोदी शेरे लिहून किंवा व्यंगचित्रे टाकून निषेध व्यक्त करतील.

पेट्रोल संपले तर निबंध मराठी

विरोधक सरकार विरोधात आंदोलन करतील, काही बसेस जाळल्या जातील तर काही दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या जातील. आणि लगेच त्याचे फोटो पेपरात छापून येतील. मग सरकार ही दरवाढ थोडी मागे घेऊन पेट्रोलचा दर 100 रुपये लिटर होईल.

हा देखील निबंध वाचा »  मताधिकाराची सक्ती करावी का? निबंध मराठी | Matadhikarachi Sakati Karavi Ka Eassy Marathi

काही केले तरी देखील केव्हा ना केव्हा पृथ्वीवरचे पेट्रोल संपेलच. मग पेट्रोलपंप बंद पडतील. तरुण-तरुणी त्या जागेचा आणि आडोशाचा उपयोग आपसातल्या परस्पर संवादांसाठी आणि इतर कार्यांसाठी करून घेतील. पेट्रोल पंप वाटपात घोटाळे करून पैसे खाणारे नेते आता गुरांच्या गोठ्यांचे वाटप करताना पैसे खातील.

प्रवासासाठी लोक बैलगाड्या, इलेक्ट्रिक बाईक, साइकल वापरतील. श्रीमंत लोक रथ वापरतील. तरुण मुले दुचाकी ऐवजी घोडा, गाढव किंवा खेचर वापरतील. बँका आता वाहनां ऐवजी गुरे ढोरे, टांगा, बैलगाडी विकत घेण्यासाठी कर्ज देतील. {Petrol Sample Tar Marathi Nibandh}

Petrol Sample Tar Marathi

पेट्रोल मध्ये भेसळ करणारे गुंड आता गुरांसाठी असलेले गवत आणि कडबा यात लाकडाचा भुसा वगैरेची भेसळ करून गब्बर होतील. नो पार्किंगमध्ये बांधलेले घोडे पोलिसांकरवी उचलून नेली जातील. गाढवाला मात्र उचलून नेणे अवघड होईल. कारण ते पोलिसांना लाथ मारील.

विवाहित बायका पायी फिरायला जाताना घोड्यावरून आलेले गुंड त्यांच्या गळ्यातली मंगळसूत्रे खेचून नेतील. टायर आणि ट्यूब विकणारे लोक गुरांच्या पायाला ठोकण्यासाठी असलेले नाल विकतील. रिक्षावाल्यांचे साम्राज्य संपुष्टात येऊन पुन्हा टांगेवाल्यांचे राज्य येईल.

शाहरुख खान दिलीप कुमारच्या ‘नया दौर’ सिनेमाचा रिमेक बनवून टांगेवाल्याची भूमिका साकारील आणि पुन्हा त्याला अभिजात रसिक शिव्या घालतील. आणि एके दिवशी बातमी येईल की सरकारने गुरांचा चारा आणि कडब्याचे भाव नियंत्रणमुक्त केले असून गवत देखील उद्यापासून 100 रुपये किलो झाले आहे.

पेट्रोल संपले तर निबंध

आपणच आठवा काही वर्षांपूर्वी डिझेल-पेट्रोल दर काय होते? आणि आज आपण पाहतोय ते कुठे पोहोचलेत. आता या सर्वांवर मात आपण करायची कशी? जागतिक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नाही पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो. ती म्हणजे या आपण वापरणाऱ्या इंधनाची बचत. ते मात्र आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल अगदी नाही म्हटलं तर. “Petrol Sample Tar Marathi Nibandh”

तर मित्रांना “Petrol Sample Tar Marathi Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हा देखील निबंध वाचा »  मी नव्या युगाचा मतदार निबंध मराठी | Mi Navya Yugacha Matdar Nibandh Marathi

मित्रांनो, तुमच्याकडे “पेट्रोल संपले तर निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

हे पण वाचा :-

पेट्रोल म्हणजे काय समजते?

गॅसोलीन किंवा पेट्रोल हे पेट्रोलियमपासून तयार केलेले द्रव-मिश्रण आहे. हे प्रामुख्याने अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये इंधन म्हणून वापरले जाते. हे एसीटोनसारखे शक्तिशाली विरघळणारे एजंट म्हणून देखील वापरले जाते.

पेट्रोलमध्ये कोणता वायू आढळतो?

नैसर्गिक वायू आणि पेट्रोल यांसारख्या इंधनांमध्ये हायड्रोकार्बन्स असतात. ही फक्त हायड्रोजन आणि कार्बनची संयुगे आहेत.

3 thoughts on “पेट्रोल संपले तर निबंध मराठी | Petrol Sample Tar Marathi Nibandh”

  1. Pingback: ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Shikshan Nibandh - निबंध मराठी

  2. Pingback: मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध - निबंध मराठी

  3. Pingback: {12th} आमची अविस्मरणीय सहल मराठी निबंध | aamchi avismarniya sahal marathi nibandh 12th - निबंध मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top