प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi

Pradushan Ek Samasya

Pradushan Ek Samasya Nibandh Marathi – मित्रांनो आज आपण “प्रदूषण एक समस्या निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Pradushan Ek Samasya

प्रदूषण हे अनेक प्रकारचे असते यामध्ये मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण,  माती प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, रेडिओधर्मी प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीर समस्यांचा विषय बनला आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण वाढत चाललेल आहे.

त्यामुळे सर्व जीवांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमक तरी काय? वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. {Pradushan Ek Samasya }

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

प्रदूषणाची समस्या फक्त मानवी जीवनालाच भेडसावत आहे असे नाही तर हि समस्या संपूर्ण जीवित प्राण्यांच्या अस्तित्वाला धोकादायक झालेली आहे. आज कित्येक शहरात प्रदूषण आपल्या विक्रमी स्तरावर चढलेला आहे. प्रदूषणामुळे ओझोन चे स्तर खूपच कमी झालेले आहे.

शास्त्रज्ञांचे असे मत आहे कि काही काळानंतर ओझोनची परत पूर्णपणे नाहीशी होईल आणि पृथ्वीवरील जीवन आपोआप संपुष्टात येईल.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे :-

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी:- जेव्‍हां काही विषारी पदार्थ नद्या, समुद्र, तलाव, आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात किंवा पाण्यात सडतात, कुजतात यामुळे पाणी अशुद्ध होते आणि जलप्रदूषण होते.

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा:- वायू प्रदूषण म्‍हणजे वातावरणात घातक दूषित पदार्थ मिश्रित होतात आणि वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो.

ध्वनिप्रदूषण म्हणजे मोठा आवाज:– नको असलेला, खूप जोराचा आवाज म्‍हणजेच ध्‍वनि प्रदूषण. ९० डेसिबल पेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.

ध्‍वनिप्रदूषणामुळे फक्‍त चिडचिडपणा किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो.

मृदा प्रदुषण:- मृदा म्हणजे मातीचे सुद्धा प्रदुषण होते. pradushan ek samasya marathi nibandh

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh

जल प्रदूषणाची कारणे:- 

 • औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.
 • नदीत कपडे धुणे, भांडी घासणे हे प्रकार रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

उपाय योजना:- 

जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो.

पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.

वायू प्रदूषणाची कारणे:-

 • सल्फर डायॉक्साईड (SO2)
 • नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड (NO and NO2)
 • ओझोन (O3)
 • व्होलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC)
 • कार्बन मोनॉक्साईड(CO)

उपाययोजना:-

केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण आपली वाहतूक व्यवस्था धरता येईल

विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणार्‍या प्रदूषणावर विकसित देशात बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे.

वायू प्रदूषणाची कारणे:-

 • या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात.
 • विविध मिडीया मुळे आवाजा चा गोंगाटा वाढला आहे आणि त्याचा विपरित पिरीणाम दिसून येतो. ‘Pradushan Ek Samasya ‘

उपाययोजना:-

 • वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत.
 • पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते.

प्रदूषणावर नियंत्रण कसे ठेवावे?

प्रदूषणावर मात करण्यासाठी काही मूलभूत उपाय योजना करण्यात येऊ शकते जेणे करून प्रदुषणाच्या समस्येवर थोडे का होईना काही प्रयत्न तर होईल.

प्रदूषणच्या भंयकर संकटातून सुटका करण्याकरीता मनुष्यास काही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कधीही सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नका. जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्नावर जोर दिले पाहिजे. जोराजोरात हॉर्न वाजविणे, गाणे वाजविणे इत्यादींवर टाळा बांधण्यात यावा.

रासायनिक खतांच्‍या ऐवजी जैविक खतांचा वापर,पॉलिथिनच्‍या ऐवजी कागदाचा वापर, पॉलिएस्‍टरच्‍या ऐवजी कॉटन, ज्‍यूटचा वापर करण्‍याकडे कल ठेवा. जास्तीतजास्‍त झाडे लावा. तुमच्‍या टीव्‍ही आणि म्‍युझिक सिस्‍टमचा आवाज कमी ठेवा. गाडीचा हॉर्न क्‍वचितच वाजवा.

लाउडस्‍पीकरचा वापर करण्यास प्रोत्‍साहन देऊ नका. लग्‍नाच्‍या वरातीत बॅन्‍ड व फटाक्‍यांचा वापर करू नका. घरे, फॅक्‍टरी, वाहने यांपासून निघणार्‍या उत्‍सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा. pradushan ek samasya marathi nibandh

मृदेचे संरक्षण कसे करता येईल ह्याकडे नेमके प्रयत्न झाले पाहिजे. असे काही मूलभूत प्रयत्न अमलात आणल्यास प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर थोडे का होईना निदान मात तर करण्यात येईल. प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. आणि या हानिकारक समस्येतून मनुष्यच स्वतःची सुटका करू शकतो. सर्व मिळून प्रण घ्या की आपण प्रत्येक जण प्रदूषण संपवण्याचा प्रयत्न नक्की करणार.

तर मित्रांना “pradushan ek samasya marathi nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “प्रदूषण एक समस्या मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

प्रदूषण म्हणजे नेमक तरी काय?

वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.

प्रदूषण हे कोणकोणत्या प्रकारचे आहे?

प्रदूषण यामध्ये मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, रेडिओधर्मी प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो.

2 thoughts on “प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi”

 1. Pingback: जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध - निबंध मराठी

 2. Pingback: प्लास्टिक कचरा व्यवस्थापन निबंध मराठी | Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi - निबंध मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top