प्रवास वर्णन मराठी निबंध | Pravas Varnan Marathi Nibandh

Pravas Varnan Marathi Nibandh – मित्रांनो आज “प्रवास वर्णन मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. प्रवास, आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. आपण प्रत्येकजण कधी ना कधी, कोणत्यातरी कारणाने प्रवास करतोच.

Pravas Varnan Marathi Nibandh

लांबचा वा जवळचा, नेहमीचा असो वा कधीतरी केलेला, प्रत्येक व्यक्ती प्रवास करते. मातेचे उदर ते स्वत:चे घर हाही एक प्रवासच असतो. पण, प्रवास, प्रवास म्हणजे असतं तरी काय?

फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या इप्सित ठिकाणी जाणं ? अहं ! प्रवास असतो एक चित्रपट या चित्रपटाचा निर्माता साक्षात ईश्वर. त्यामुळे त्याने या चित्रपटात त्याने सर्व रंग उधळलेले आहेत फक्त, आपल्यासाठी ! प्रवास आपल्याला निसर्गाच्या विविध रूपांची ओळख करून देतो. ‘Pravas Varnan Marathi Nibandh’

कधी, पांथस्थांना सावल्या देणाऱ्या, परार्थहित जपणाऱ्या वृक्षांचे दर्शन देतो. तर, कधी त्यालाच लपेटून वाढलेली जिद्दी वेलही दाखवतो. जाताजाता शेताकडचं खुरटं गवत दिसतं, तर डोंगरावरची दाट वनराईही दिसते.

प्रवास वर्णन मराठी निबंध

शेतात पिकलेलं कणसांतले सोने दिसते, तर कधी तरारलेली भाताची पिकं दिसतात. हळूच, सूर्याचा आभास दाखवणारी सुर्यफुलंही दर्शन देऊन जातात. कधी, भकास, उदासवाणे माळरान दिसते.

कधी लाडक्या बैलजोडीसोबत उन्हातान्हात घाम गाळणारा शेतकरी दिसतो. तर पराक्रमाची गाथा सांगणारा एखादा गड पाहिल्यावर छाती अभिमानाने फुलुन येते. “Pravas Varnan Marathi Nibandh”

मग, साक्षात निसर्ग वाऱ्याच्या रूपात शीळ घालत आपल्या भेटीला येतो. कधी पावसाची भूरभूर, तर कधी सहस्ररश्मीची सोनेरी किरणे, कधी अल्लड काळे ढग, आणि, आणि मधेच गावची आठवण करून देणारी मातीची पायवाट आणि कौलारू घरे! किती ते प्रकार ! किती रूपातुन ॐकार प्रकट होत जातो.

Pravas Varnan Marathi Nibandh

जाता जाता आपली सोबत करणारे असंख्य पक्षी, इवलेसे प्राणी तर दुसऱ्या बाजूस मानवी प्रगतीचे शिखर दाखवणारी उंच लांब शहरे ! मिठाचा खडा टाकल्याप्रमाणे एखादा धूर ओकणारा कारखाना दिसतोच, पण तोही यंत्रयुगाची ताकद दाखवून देतो.

कोठेतरी अल्लड, अखवळपणे वाहणारी एखादी नदी, कधी पक्ष्यांच्या थव्याने शोधलेला शांत तलावाचा विसावा. कोठे शेजारून जाणारी बैलगाडी, अंधाराची अनुभुती देणारा लांबलचक बोगदा, कधी पवनचक्या, तर कधी कडेच्या रूळावरून जाणारी रेल्वे निसर्गाचं प्रत्येक रूप इथं पाहता, अनुभवता येतं. Pravas Varnan Marathi Nibandh

मिळणाऱ्या एकांताचा फायदा घेऊन त्यावर विचार करता येतो. अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संदेशांचा अर्थ लावता येतो. हा होता निसर्ग, पण प्रवासात अनेक प्रकारची ओळखीची ओळख-पाळख नसलेली देखील माणसं भेटतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती ! या स्वभावांचा खजिना प्रवासात उलगडला जातो.

प्रवास वर्णन मराठी निबंध

विविध बोलीभाषा, विचार यांची देवाण घेवाण होते. समाजाची वीण घट्ट होण्यास मदत होते. माणसाची प्रकृती आणि समाजाची संस्कृती
समजत जाते. प्रवास असतो या सर्वांची खाण ! निसर्गाने आपल्या सर्व कलाकृती इथे मांडलेल्या असतात.

फक्त आपल्या नेत्रसुखासाठी, मनात साठवून ठेवण्यासाठी, जगण्याचा जगवण्याचा संदेश देण्यासाठी. पण, हे सर्व पाहण्यासाठी ती दृष्टी आपणाजवळ असायला हवी. ती मिळाली की सारे जग आपलेच.

कोणीतरी म्हटलेच आहे ना की खेळायला, जगायला दिलेलं हे अंगणच! ते अगदी खरे आहे. म्हणूनच ती दृष्टी मिळाल्यावर एवढासा प्रवास असो वा लांबलचक जीवनप्रवास. तो फक्त प्रवास राहत नाही. Pravas Varnan Marathi Nibandh

Pravas Varnan Marathi Nibandh

ती होते एक आनंदयात्रा !जीवनाच्या वाटेवरून रमतगमतं चालणं म्हणजेच आनंदयात्रा ! या वाटेवर रमतगमत चालायचे, वळणावळणावर थांबायचे, भरभरून आस्वाद घ्यायचा.

आनंदरूपी फुले मिळवायची आणि ती मिळवताना घसरून पडलो तरी घाबरून जायचे नाही. पुन्हा उठायचे, त्या चिखलातल्या मातीचादेखील सुवास अनुभवायचा आणि चालत राहायचे दिगंतरापर्यंत …. असाच प्रवास अनेकांनी केला, करत आहेत.

आयुष्यातला प्रत्येक क्षण जगतायतं, देहभान विसरून आनंदलहरीत सामावून जात आहेत. फक्त निरोगी नव्हे तर अपंग, परावलंबी असणाऱ्या माणसांनी ही दृष्टी मिळवून आयुष्यात रंग भरलेले आहेत. तर मग आपण का थांबलोय ? आपण एवढे कष्ट करतो ते जीवन सुखी करण्यासाठी. मग, थोडे प्रयत्न करूया ना ही दृष्टी मिळवण्यासाठी. Pravas Varnan Marathi Nibandh

प्रवास वर्णन मराठी निबंध

अनुभवांना निरिक्षणाची जोड देऊन निसर्ग जाणून घेण्यासाठी. कारण, एकदा ती दृष्टी मिळाली की अलीबाबाची गुहाच आपल्याला खुली होते. आणि, कोणाला आवडत नाही अलीबाबाच्या गुहेत जायला. तर मग करताय ना प्रयत्न ? शुभास्ते पन्थानः सन्तु !

तर मित्रांना “Pavas Varnan Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “प्रवास वर्णन मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment