राष्ट्रीय गणित दिवस निबंध मराठी | Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi

Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi

Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi – मित्रांनो आज “राष्ट्रीय गणित दिवस निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म : तिरोड-तंजावर, 22 डिसेंबर 1887 रोजी झाला. श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे सारखा गणिताचाच विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. “Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi”

राष्ट्रीय गणित दिवस निबंध मराठी

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1911 साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 1913 साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला.

हा देखील निबंध वाचा »  माझा आवडता महिना 'श्रावण' मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shravan Marathi Nibandh

प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 17 मार्च 1914 रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.

रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी. एच. हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता 1729. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी ‘नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.’ असं सांगितलं. {Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi}

Rashtriya Ganit Diwas Nibandh

123+13 = 1729 आणि 103+93= 1729.

तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी – रामानुजन संख्या म्हटले जात . 1914 ते 1917 या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. 1918 साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली.

ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे.

हा देखील निबंध वाचा »  मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | Mi Sainik Boltoy Nibandh Marathi

काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये 351 पाने होती. त्यांत 16 धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत, अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये 256 पाने होती. [Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi]

राष्ट्रीय गणित दिवस निबंध

त्यातील 21 स्पष्ट होती, तर 100 पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता. तिसऱ्या वहीमध्ये 33 पाने अव्यवस्थित होती. 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. (Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi)

वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी 27 एप्रिल, 1920 रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.

तर मित्रांना “Rashtriya Ganit Diwas Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “राष्ट्रीय गणित दिवस निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म कधी झाला?

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तिरोड-तंजावर, 22 डिसेंबर 1887 रोजी झाला.

हा देखील निबंध वाचा »  मतदानाचे महत्व निबंध मराठी | Matadanache Mahatva Nibandh Marathi

श्रीनिवास रामानुजन हे कोण होते?

श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top