रस्ता सुरक्षा निबंध मराठी | Rasta Suraksha Nibandh in Marathi

Rasta Suraksha Nibandh in Marathi – मित्रांनो आज “रस्ता सुरक्षा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

 Rasta Suraksha Nibandh in Marathi

महाराष्ट्र राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघाता मुळे होत असतात. या अपघातामधे दर वर्षी जवळपास 20 हजार पर्यंत प्रवाशांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या उपस्थित होतो.

ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपण सर्व लोकांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व एक एकमेकांपर्यंत पोहचवण्याचे काम या माध्यमातून करायला हव. राज्यात दरवर्षी सरासरी 20 हजार लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. या अपघातामधे मृत्युमुखी पडणाऱ्या 80 टक्के लोकांचे वय हे साधारणपणे 18 ते 35 वयोगटातील असते.

महाराष्ट्र राज्यातील तरुण मनुष्यबळ जर येवढय़ा मोठय़ा प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.  केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. Rasta Suraksha Nibandh in Marathi

रस्ता सुरक्षा निबंध मराठी

रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविले जात असतात. शाळा व कॉलेजेसमधून मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाऴांमधील परिवहन समित्यांची बैठक घेणे, स्कूल बसेसची तपासणी करणे व मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग घायला हवा.

मुलांच्या तसेच वाहनचालकांच्या प्रबोधनासाठी पेण उपप्रादेशिक कार्यालयाने वाहतुकीची पाठशाळा नावाचे एक पुस्तकही तयार केले आहे. या सप्ताहादरम्यान वाहनचालकांची नेत्र तपासणी व रक्तदाब चाचणी केली पाहिजेल. तर दुसऱ्या टप्प्यात वाहतूक नियमाची कठोर अंमलबजावणी केली पाहिजेल.

Rasta Suraksha Nibandh

यात हेल्मेट आणि सिटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, मद्यपान करून गाडय़ा चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे. जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे यांसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेल. तेव्हा खूप प्रकारे रस्ता सुरक्षा होईल.

याशिवाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करायला हवे.

तर मित्रांना “Rasta Suraksha Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “रस्ता सुरक्षा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

रस्ता सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.

भारतात राष्ट्रीय सुरक्षा महिना काय आहे?

सुरक्षितपणे काम करण्यासाठी जागरूकता आणि वचनबद्धता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 मार्च रोजी भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो.

Leave a comment