राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी | Rastriy Ekatmata Nibandh Marathi

Rastriy Ekatmata Nibandh Marathi – मित्रांनो आज “राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. आपल्या भारत देशात अनेक जातिधमांचे वंशभेदाचे, वर्णांचे लोक राहतात.

या सर्व लोकांत भाषिक, प्रादेशिक भिन्नत्व आहे. प्रादेशिक संस्कृती, सणसमारंभ या बाबतीत बेगळेपणा आहे. पोशाख, रीतीरिवाज यातही वेगळेपणा आढळतो, तरीदेखील आम्ही सर्वजण भारतीय आहोत.

Rastriy Ekatmata Nibandh Marathi

आमचे वेद, आमचा इतिहास आमची परंपरा उच्चतम आहे; याची जाणीव आम्हा भारतीयांस असली पाहिजे, भारताच्या ऐक्यासाठी प्रत्येक भारतीयाने जागरूक असले पाहिजे. देशाच्या ऐक्यास बाधा येईल असे वर्तन कोणाही नागरिकाच्या हातून होता कामा नये. या प्रवृत्तीसच ‘राष्ट्रीय एकात्मता’ असे म्हणतात.

भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी अनेक वीरांनी बलिदान केले, जीवनसर्वस्व स्वातंत्र्यासाठी खर्च केले. त्यांच्या रोमारोमांत राष्ट्रीय एकात्मता भिनली होती. आज स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे होऊन गेली आहेत.

आज राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याची वेगळीच जबाबदारी आपणावर आहे. हा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे. विविधतेत ऐक्य साधणाऱ्या आमच्या या संस्कृतीत अनेक उज्ज्वल गोष्टी घडलेल्या आहेत. “Rastriy Ekatmata Nibandh Marathi”

राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी

आर्य संस्कृती, ऋषि-मुनी, महाकाव्ये यांची थोर परंपरा आपल्या देशास आहे. रामायण, महाभारतातूर नीतिबोधाचे तत्त्वज्ञान आचारविचार यांचे दर्शन होते. निरनिराळ्या राजांच्या पराक्रमांची वर्णने बखरी, पोवाडे आजही सांगतात.

निरनिराळ्या नद्यांचा परिसर, संस्कृती, तीर्थक्षेत्रे ही आमच्या चालीरीतींचे, धार्मिक रीतीरिवाजांचे जिवंत दर्शन घडवितात. राष्ट्रीय एकात्मतेस बाध आणणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात.

प्रत्येक धर्माचे तत्त्वज्ञान हे चांगले आहे; परंतु तत्त्वज्ञान आणि आचार यामध्ये फारकत होते. धार्मिक मतभेद लागतात. कधी कधी ते विकृत, विध्वसक रूप घेतात. मारामारी, खून, दंगे अशा स्वरूपात ते उजेडात येतात. यासाठी सामंजस्याने कोणताही प्रश्न सोडविला पाहिजे. Rastriy Ekatmata Nibandh Marathi

Rastriy Ekatmata Nibandh Marathi

समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासाच्या दृष्टीने हातभार कसा लावता येईल हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे. निरनिराळे प्रादेशिक बाद निर्माण होतात, सीमा, तटा, भाषावाद बगैरे. त्यामधून निर्माण होणारे तणाव हानिकारक ठरतात. उदा. कर्नाटक, आसाम, पंजाब या ठिकाणी निर्माण झालेले वाद.

मी प्रथम भारतीय आहे. धर्मनिरपेक्षतेने सार्वजनिक जीवनात दुसऱ्याच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर मी गदा आणणार नाही, याची जाणीव सदैव राखली पाहिजे.

ऐक्यास बाघ आणणारी तिसरी गोष्ट म्हणजे परकीय आक्रमणाचा धोका अंतर्गत बंडाळी, फुटीर वृत्ती, फितुरीबरोबर परकीय आक्रमण परतवून लावण्याचा प्रयत्न करणे हे क्रमप्राप्त आहे. उदा. चीन, पाक यानी आक्रमण केले तेव्हा एकजुटीने सर्व भारत उभा राहिला. अशा संकटांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रीय ऐक्य टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Rastriy Ekatmata Nibandh Marathi

राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी

आपले स्वातंत्र्य हे अज्ञात हुतात्म्यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी तत्पर राहणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी राष्ट्रीय वृत्ती अंगी बाणणे जरूर आहे.

आपले राष्ट्र अधिक वैभवशाली सामर्थ्यसंपन्न कसे होईल याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे विध्वंसक कार्य करणाऱ्या ऐक्याला बाधा आणणाच्या पाशवी शक्तींचा निःपात केला पाहिजे राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव शाळेत, कुटुंबात, संस्थांत, समाजात दिली जावी, राष्ट्रीय एकात्मता हीच आजची गरज आहे. तिच्या पूर्तीसाठी सर्वांनी झटले पाहिजे. Rastriy Ekatmata Nibandh Marathi

Rastriy Ekatmata Nibandh Marathi

सामाजिक बंधने झुगारणे, कायदेकानून न जुमानणे, जातीयतच्या लहानसहान गोष्टींना भीषण स्वरूप देणे. आपापसांतील मतभेद विकापास नेणे या गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेस विचालक आहेत. त्या टाळल्या पाहिजेत.

स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही तत्त्वे देशात रुजली पाहिजेत. यासाठी सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. मानवतावादी दृष्टीने इतरांशी वागले पाहिजे. सौजन्याने सर्वांशी वागले पाहिजे. मानवतावादी ध्येयवादाने जीवनाकडे पाहिले जावे.

स्वार्थी वृत्ती, फसवेगिरी, लाचलुचपत, साठेबाजी, काळाबाजार, भ्रष्टाचार या गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘Rastriy Ekatmata Nibandh Marathi’

राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी

अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बुरसटलेली मते नष्ट केली पाहिजेत. अस्पृश्यतेसारख्या भयंकर रोगांवे उच्चाटन केले पाहिजे. सर्व समाज वैभवशाली करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण प्रत्येक भारतीयास मिळणे जरूर आहे.

तर मित्रांना “Rastriy Ekatmata Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment