संगणक शाप की वरदान निबंध मराठी | Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi – मित्रांनो आज “संगणक शाप की वरदान निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

विज्ञान जगतात कोणताही शोध लागला की, त्याकडे एका बाजूने औत्सुक्य व एका भय अशा परस्परविरोधी भावनेने बघितले जाते. Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

संगणकाचा शोध लागला; त्या विषयी बाजूने नवीन नवीन बातम्या ऐकू येऊ लागल्या. त्यात एक बातमी अशी होती की, एकटा संगणक जवळ जवळ ५० माणसांचे काम करतो. ही बातमी ऐकून भारतीयांचे धाबेच दणाणले. भारत विकसनशील देश. त्याला संगणक परवडेल का?

संगणकामुळे भारतातील बेकारीची समस्या अधिक तीव्र तर होणार नाही ना? एक अन् दोन. त्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली.

संगणक शाप की वरदान निबंध मराठी

इतर शोधांचे होते तेच संगणकाचे झाले. नवा शोध प्रथम परका, अनावश्यक पण जसजसा त्याचा परिचय होईल तसतसा तो हवाहवासा वाटतो. [Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi]

विकसित देशांच्या दृष्टीने संगणकाचे आता अप्रूप राहिलेले नाही. इ. स. १८३२ साली चार्ल्स बॅबेजने हे बाळ जन्माला घातले. जन्माला आले, तेव्हा हे बाळ अंगापिंडाने प्रचंड होते.

पण हळूहळू त्याचे कर्तृत्व वाढू लागले आणि त्याच्या शरीराला बांधेसूदपणा आला. आता तर ते इतके छोटे झाले आहे की ते घड्याळात, टिचभर अंगठीत राहूनही आपले काम करते.

हा देखील निबंध वाचा »  सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar

Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

संगणक काय करतो, असे विचारण्यापेक्षा संगणक काय करत नाही, असा प्रश्न विचारणे जास्त योग्य ठरेल, इतके त्याचे कार्य चौफेर आहे.

संगणकाचा संचार त्रिभुवनात आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी देखील संगणकाची मदत होते.

खाणी, कारखाने इत्यादी ठिकाणी विषारी वायूचा धोका असतो. अशा ठिकाणी प्राणहानी टाळण्यासाठी संगणकाचा उपयोग होतो. संगणक हवामानाचा अचूक अंदाज बांधतो. बँकांतील आर्थिक व्यवहार आता संगणकाकडून केले जातात. Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

संगणक शाप की वरदान निबंध मराठी

प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण, दूरध्वनीची बिले, विजेची बिले संगणकाद्वारेच करतात. आता शाळा-कॉलेजांतील मुलांना आवर्जून संगणकाचे शिक्षण दिले जाते. ते त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यकच असते. आता तर संगणक घराघरांत स्थिरावला आहे.

त्यामुळे घरातील मंडळींना परदेशी असलेल्या नातेवाइकांची, मित्रमंडळींची ख्यालीखुशाली विचारता येते. एवढेच नाही; तर संगणकावर चॅटिंग करून तुम्ही आपल्या जन्माचा जोडीदारही निवडू शकता.

थोडक्यात, संगणक हा साऱ्यांचा जिवलग मित्र झाला आहे. प्रत्यक शास्त्रीय विकासात नवा शोध हा एक नवी पायरी असते. तिच्यावर पाय ठेवल्याशिवाय विकासाच्या पुढच्या टप्प्यावर पदार्पण करताच येत नाही.

Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi

प्रत्येक नवीन शोधाचा स्वीकार ही गोष्ट आवश्यक असते. संगणकाचा शोध पाश्चात्त्यांनी लावला असला, तरी अमेरिकेतील ‘सायबर लॉबी’ भारतीय तरुण समर्थपणे सांभाळत आहेत ही गोष्ट अभिमानाची नाही का?

म्हणूनच संगणकामुळे मिळणाऱ्या कामाची प्रतवारी चांगली असते. चांगली प्रतवारी आणि उत्पादनखर्चातील बचत यांमुळे सर्व प्रकारे आर्थिक बचत होते, जिचा आपल्याला इतरत्र उपयोग करता येतो. “Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi”

हा देखील निबंध वाचा »  'लेक वाचवा' लेक शिकवा निबंध मराठी | Mulgi vachva mulgi shikva nibandh

संगणक तयार करणे, त्याची दुरुस्ती करणे, त्यावर प्रोग्रॅम्स तयार करणे यासाठी माणसे लागतातच. ५० जणांचे काम एकटा करणारा संगणक इतर ७५ जणांन काम देतो म्हणूनच संगणक एक वरदान आहे, शाप नव्हे!

तर मित्रांना “Sanganak Shap Ki Vardan Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “संगणक शाप की वरदान निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top