“संत गाडगे बाबा” निबंध मराठी | Sant Gadge Baba Nibandh in Marathi

Sant Gadge Baba Nibandh in Marathi – मित्रांनो आज “संत गाडगे बाबा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Sant Gadge Baba Nibandh in Marathi

संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई-बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू.
डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली.

डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धत होती.

काबाडकष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता, त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते. ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली, तर औषध न घेता देवाला नवस करत होते. “Sant Gadge Baba Nibandh in Marathi”

“संत गाडगे बाबा” निबंध मराठी

कोंबडे-बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही.

आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगेमहाराजांनी मनाशी ठरवले, की ‘मी इतके कष्ट करीन, की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. त्यांच्यात सुधारणा होइल.

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सग्यासोयऱ्यांचा त्याग केला. ‘सगळी माणसे हे आपले सगेसोयरे, सगळे विश्व हेच आपले घर,’ असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन-कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात, लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. (Sant Gadge Baba Nibandh in Marathi)

Sant Gadge Baba Nibandh

बाबा कसे दिसत ? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग. अंगात फाटका पण स्वच्छ सदरा. जाडजूड, धिप्पाड देह. नेसायला एक लुंगी. एका पायात कापडाचा बूट, तर दुसरा पाय अनवाणी. हातात एक काठी अन् एक गाडगे. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले; पण दुसरा कोणी पाय धरू लागला, की ते पसार होत. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे, म्हणून लोक त्यांना गाडगेमहाराज म्हणत.

घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची अन् गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या ! झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उश्याला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, ‘तू तर चांगला धडधाकट आहेस.

माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर!’ बाबांनी म्हणावे, ‘या कुन्हाड.’ कुन्हाड हाती आली, की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे, तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे ! बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहानभुकेची पर्वा कोण करतो ? भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. “Sant Gadge Baba Nibandh in Marathi”

“संत गाडगे बाबा” निबंध

गाडगेबाबांच्या कीर्तनाला दहा-दहा हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले रे संपले, की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. ‘लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही,’ असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय ?

कळवळून ते म्हणायचे, ‘बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे. त्याला जागं करा.’ हा उपदेश करत गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायांखाली घातली. बाबांचा एक नियम होता. तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे, फावडी, घमेली मागवत.

मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला, की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, ‘तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन् दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरंगोजरं दिसतं आता !’ तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का ? नाशिक बघितले आहे ? अन् देहू ? आणि आळंदी ? महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हांला दिसेल, की बाबांनी स्वतः राबून, कष्ट्रन, मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया उघडल्या. {Sant Gadge Baba Nibandh in Marathi}

Sant Gadge Baba

गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविदयालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले, की बाबा तिथे हजर! स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा दयायचे. Sant Gadge Baba Nibandh in Marathi

त्यांतून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा !

तर मित्रांना “Sant Gadge Baba Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “संत गाडगे बाबा निबंध मराठी मराठी” मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला?

संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला.

संत गाडगे महाराज याचं टोपण नाव काय आहे?

संत गाडगे महाराज याचं टोपण नाव डेबू आहे.

Leave a comment