संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi Shikavan Marathi Nibandh

Santanchi Shikavan Marathi Nibandh – मित्रांनो आज “संतांची शिकवण मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Santanchi Shikavan Marathi Nibandh

संतांची शिकवण / कामगिरी माझी मायभूमी म्हणजे संतांची पुण्यभूमी, भारतीय संतांची अतथ जन्मभूमी. भारतभूमी ही संताची भूमी आहे. भारतातील सगळ्या प्रांतांमध्ये अनेक थोर संत होऊन गेले.

त्यांनी समाजाला भक्तीमार्गाची शिकवण दिली, ज्ञान दिले. महाराष्ट्रातही अशी थोर मंडळी होऊन गेली म्हणून महाराष्ट्राला साधू संताची भूमी म्हटले जाते. कारण साधू संतांनी या भुमीत क्रांती घडवली. महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा सुगंध आहे. ‘Santanchi Shikavan Marathi Nibandh’

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती ।
देह झिजवीती उपकारे |”

संतांची शिकवण मराठी निबंध

हे संताचे मुख्य लक्षण आहे. संतानी मानवतावादाची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. संत म्हणजे सत्पुरुष. संतांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते.

या संतासी भेटता | हरे संसाराची व्यथा

जिवनाचे ध्येय गाठण्याचा प्रत्येकाचा मार्ग निराळा असला तरी अंतिम ध्येय एकव असते. संत केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणाचे आदर्श समाजापुढे दाखवतात.

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानातून संपूर्ण मानव जातीचे हीत केले आहे. संत एकनाथांनी हिशोबातील एका पैशाची चूक शोधण्यासाठी रात्रभर जागरण केले. या साध्या गोष्टीतून जनसामान्यांनाही व्यवहारात चूक राहाण्याचा आदर्श घालून दिला. “एकमेका साहय कुरु, अवघे धरू सुपंथ “

Santanchi Shikavan Marathi Nibandh

या काव्यातून संत तुकारामांनी सहकार्याची भावना जागृत केली आहे. वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता येणाऱ्या परिस्थीतीचा सामना करा. चांगल्या दिवसात उन्मत होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये.

‘जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||

यासारख्या अभंगातून संत तुकारामांनी भूत दयेचा मंत्र दिला. आज आपण झाडे ला वा, झाडे जगवा, देश वाचवा. अशी घोष वाक्य देत झाडांचे, मानवी जीवनाचे महत्व जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

ही संकल्पना कितीतरी शतकापूर्वीच संत तुकारामांनी आपल्या अभंगातून सांगीतली होती. नेटका प्रपंच करून परमार्थ कसा साधावा याची शिकवण समर्थ रामदासांनी समाजाला साधावा दिली. Santanchi Shikavan Marathi Nibandh

संतांची शिकवण मराठी निबंध

राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय खेळ आपल्याला महत्वाचे वाटतात पण रामदास स्वामीनी तर बलोपासाना, व्यायाम याचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी आखाडे उभारले होते.

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो-जो करील तयाचे।

असा संदेश समर्थ रामदासांनी दिला. संत गाडगे बाबां यांनी स्वच्छता अभियानाचा पाया रचला. लोक आजही त्यांच्या कार्यानी प्रभावित होऊन स्वच्छतेला प्राधान्य देतात.

स्वामी विवेकानंद, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या राष्ट्रसंतांनी समाजातील दोष काढून राष्ट्राचे चैतन्य निर्माण केले. वसुधैव कुटुम्बकम या संकल्पना संताच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहे.

Santanchi Shikavan Marathi Nibandh

काळ बदलतो, समाज बदलतो र्पण सत्य निती, चरीत्र, मानवता, कर्मयोग, प्रेम, बंधूभाव, दिनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्वे कधीच बदलत नाही. संत हे समाजाचे मार्गदर्शक आहेत.

साधु-संताच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संताच्या कामगीरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. “Santanchi Shikavan Marathi Nibandh”

फक्त पुरुषच संत नव्हते तर त्यामध्ये काही महिला संत निर्माण झाल्या होत्या. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई इत्यादी कुणी लहान नाही कुणी मोठा नाही, दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता या गुणांची शिकवण दिली. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे बाबा आमटे, मदर टेरेसा या आधुनिक संतांनी मानवतेची शिकवण समाजाला दिली.

संतांची शिकवण मराठी निबंध

संतांचे विचार, जो करी स्वीकार
जीवनाचे सार, अनुभवे ||

संतांची शिकवण मराठी निबंध

मलिन झालेली मने आपल्या अमृतमय विचाराने शुद्ध करून मानवाची सर्व प्रकारे प्रगती करण्याची ताकत संतांच्या शिकवणीत आहे. जसे एखादी गाय आपल्या वासराचा विचार करत असते तसेच संत मानवाला सांभाळतात.

संत तोच जाणा जगी ।
दया क्षमा ज्याचे अंगी ||
लोभ अहंता नये मना |
जगी विरक्त तोचि जाना ||

Santanchi Shikavan Marathi Nibandh

दुसऱ्याचे अश्रु पुसण्यासाठी, त्यांच्या चुकांना क्षमा करण्यासाठी समाजाला संताची आवश्यकता आहे. दया, करुणा, क्षमा, प्रेम यासारख्या उदात्त भावनांची शिकवण जर संतांकडून माणूस शिकला नसता तर माणसातील मानवता नष्ट झाली असती.

जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कार घडले तरच संस्कृती टिकेल आणि त्यातूनच समाज व देश उभा राहील. त्यासाठी संताचे थोर विचार आचरणात आणण्याची गरज आहे. Santanchi Shikavan Marathi Nibandh

संतांची शिकवण मराठी निबंध

प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगीकारल्यास मानसीकदृष्ट्या खचलेल्या समाजाला नवसंजीवनी मिळेल.

म्हणून संत सांगतात, मनुष्य जीवन लाभणे कठीण आहे, हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही जे फळ झाडवरून खाली पड़ते ते पुन्हा झाडाला लागत नाही.

तर मित्रांना “Santanchi Shikavan Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “संतांची शिकवण मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

1 thought on “संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi Shikavan Marathi Nibandh”

Leave a comment