शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध | shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh – मित्रांनो आज “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh

विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले ..
एवढे सारे अनर्थ अविद्येने केले।

महात्मा फुले शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे माध्यम आहे आणि ज्ञान ही शक्ती आहे. ज्याच्याजवळ ज्ञान नसते ते गुलाम बनतात आणि ज्यांच्याजवळ ज्ञान असते ते जगावर प्रभुत्व गाजवतात.

भारतात स्त्रियांना व बहुजनसमाजाला शिक्षण घेण्याची बंदी होती. म्हणून ते अज्ञानाच्या अंधारात आंधळे होते. उलट ब्रिटिशांनी शिक्षण घेतले, ज्ञान मिळवले आणि त्या बळावर भारतावर अधिराज्य गाजवले हा इतिहास शिक्षणाचे व ज्ञानाचे सामर्थ्य दाखवतो.

शिक्षणाने मनाचा विकास घडून येतो. अशिक्षित गुराख्याला गाई-म्हशी व चाऱ्याचे शेत यापलीकडे काहीच दिसत नाही. देश म्हणजे काय, राष्ट्रीय समस्या कोणत्या यातले त्याला काहीच कळत नाही.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध

गुलामगिरी, पारतंत्र्य व दारिद्रय यात तो सुख मानतो. सुशिक्षित माणसाच्या मनाचा विकास झाल्यामुळे तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. तो समाजासाठी क्रांती करू शकतो.

महात्मा फुले, आगरकर, महर्षी शिंदें, महर्षी कर्वे हे सारे समाजसुधारक सुशिक्षित होते. म्हणनच क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू शकले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. एरवी थंड गोळ्याप्रमाणे निर्जीव असलेला समाज शिक्षण मिळताच सजीव होऊन उठतो. [shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh]

लोकशाही, समाजवाद, मानवतावाद या मानवी मूल्यांच्या कल्पना शिक्षणाशिवाय समजणारच नाहीत. पण शिक्षण मिळताच या कल्पनांमुळे एक नवी जागृती निर्माण होते.

हा देखील निबंध वाचा »  भारतीय 'संविधान' मूल्य निबंध | Bhartiya Sanvidhan Mulya Nibandh Marathi

shikshana shivay tarnopay nahi nibandh

जेथे जेथे अन्याय आहे, विषमता आहे, पाशवी दडपशाही आहे तेथे न्याय, समता आणि स्वातंत्र्य निर्माण करायला माणूस लढा द्यायला सिद्ध होतो. शिक्षणामुळेच माणसाच्या मनात क्रांतीचे बीज अंकुरतात.

जगातील क्रांतीचे उगमस्थानही शिक्षण हेच आहे. रूसो, व्हाल्टेअर इत्यादी लेखकांनी शिक्षण घेतले. आपले अनुभव लिहून काढले. फ्रान्सची जनता यांचे विचार वाचून सजीव झाली.

त्यानंतर लोकशाहीचा उद्घोष करणारी फ्रान्सची क्रांती घडून आली. महात्मा फुलेंचे गुरू थॉमस पेन यांनी ग्रंथ लिहिले. अमेरिकन जनतेने ते वाचले. त्यानंतर स्वातंत्र्यावर आधारित अमेरिकन राज्यक्रांती झाली. {shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh}

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध

कॉर्ल मॉर्क्सने समाजपरिवर्तनाचे महत्त्वाचे सिद्धांत लिहून ठेवले. रशियन जनता त्यामुळे विचारप्रवण बनली. मग रशियात समाजवादी क्रांती घडून आली.

शिक्षणाचे व्यक्तींवर आणि समाजावर अतिशय दूरगामी परिणाम होतात. शिक्षणाने अंधश्रद्धा दूर होतात. नरबळींची प्रथा अशिक्षित समाजातच दिसून येते. शिक्षणाने विज्ञाननिष्ठा बळावते. म्हणूनच आजारावर मंत्रदोरे करणाऱ्यांची संख्या नष्टप्राय होत असून आरोग्यसंवर्धन होत आहे.

शिक्षणाने सामाजिक शोषणालाही पायबंद बसतो कारण शिक्षणाने हक्क कळतात, विद्रोहाचे सामर्थ्य येते. शिक्षण म्हणजे मानवी जीवनातील दीपज्योतच !

तर मित्रांना “shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

हा देखील निबंध वाचा »  डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी | Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

2 thoughts on “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध | shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top