शिवरायांचे बालपण निबंध मराठी | shivrayanche balpan nibandh marathi

shivrayanche balpan nibandh marathi मित्रांनो आज आपण शिवरायांचे बालपण निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

shivrayanche balpan nibandh marathi

शिवरायांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर झाला. त्यामुळे शिवनेरीवरच नामकरण विधि मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. नंतर तीन चार महिन्यांनी शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकनविधीयुक्त केले.

पुढे वर्ष दीड वर्ष हे सर्व कुटुंब शिवनेरी वरच एकत्रित होते. जवळ जवळ 7 वर्ष जिजाऊ आउसाहेब व बाल शिवाजी शिवनेरी वर होते बाल शिवाजी जेव्हा 1 वर्षाचे होते तेव्हा मुलखात दुष्काळाने उग्र स्वरुप धारण केलेले होते. त्या नंतर 1632 ते 1636 ह्या दरम्यान छत्रपती शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला. (संदर्भ – छत्रपती शिवाजी – सेतू माधवराव पगडी.)

त्या मूळे 1632 ते 1636 मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते. पुढे 1636 च्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी “फर्जंद ” वजीर म्हणून गेले. तहा प्रमाणे शहाजी महाराजांना रान दुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. [shivrayanche balpan nibandh marathi]

शिवरायांचे बालपण निबंध मराठी

तहा प्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञे प्रमाणे जिजाई वगैरेंना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाबाईला “चौलात” ठेवायचा शहाजीचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी तिला त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राज्याने छत्रपती शिवाजी महाराज व जिजाई ला खेड (शिवापूर) ला पाठविले. “shivrayanche balpan nibandh marathi”

तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता…खेड (शिवापूर) हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते. पुढे इ.स. 1637 च्या अखेर जिजाई छत्रपती शिवाजी महाराजांनसह कर्नाटकात गेले.

कर्नाटकात कंपिलीला शहाजी राज्यांच्या सोबत 1637 ते 1642 साला पर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते. तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी 7 वर्षाचा झाल्यावर.

shivrayanche balpan nibandh

अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या पद्धतीने शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण “अध्ययना” खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबा पुरता लेखन वाचनाचा सराव असे.

क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी. अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे.

त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली, वतलवारबाजी, घोडेस्वारी तश्याच अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात घेतले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजनीती चे डाव पेच अथवा राज कारभाराची कार्यपद्धती.

हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्या कडून शिकले. याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निंबाळकर पवार यांच्या “जिऊबाई” नावाच्या मुलीशी झाले. त्यंच्या सासरचे नाव “सईबाई” असे ठेविले. {shivrayanche balpan nibandh marathi}

शिवरायांचे बालपण

पुढे १६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कम कर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली. व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले.

त्या नुसार शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून आदिलशाहने काढून घेतला व त्यांचेच भाऊ बंद बाजी घोरपड्यास दिला. तसेच शहाजी राजे यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली.

हे सर्व बघून आदिलशाही तील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिला शहशी लावून ठेवले.

1642 च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले. ह्यामूळे शहाजी राज मोघालांशी संधान साधतोय कि काय ह्याची भीती आदिलाशाहाला झाली त्या मूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकला. शहाजी राज्यांना काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला.

shivrayanche balpan

1644 साली आदिलशाहने शहाजी राज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) 4 लक्षजहागिरी ऐवजी 5 लाखाचा सुभा बंगलोर दिला व तिकडे रवाना केले. (अर्थातशहाजी राज्यान सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलानकडे जाने चांगले नाही ह्या भीतीने शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले.)

इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले. इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजी राज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते. परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजी राजे पुन्हा एकदा यशस्वी झाले. shivrayanche balpan nibandh marathi’

अवघ्या 12-13 व्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाट चाल करावी लागली पण. स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील, बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूद करण्यासारखे आहे. तर छत्रपती शहाजी महाराजांना त्यांच्या लहान पणी (१० व्या वर्षी ) अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय अथवा मार्ग दर्शन मिळाले.

तर शिवाजी राज्यांचे वडील बंधू संभाजी राजे यांना तर अश्या (९ व्या वर्षी ) वेळेत स्वतःशहाजी राज्यांचे मार्ग दर्शन मिळाले. तर शिवरायांना मार्ग दर्शन मिळाले ते म्हणजे जिजाऊन्चे. shivrayanche balpan nibandh marathi

संदर्भ ग्रंथ – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक – वा.सी.बेंद्रे.१९७२
संदर्भ ग्रंथ- chatrapati Shivaji – सेतू माधवराव पगडी

तर मित्रांना “shivrayanche balpan nibandh marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “शिवरायांचे बालपण निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

हे पण वाचा 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ला (पुणे) येथे झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० / एप्रिल १६२७ रोजी झाला.

Leave a comment