सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar

surya ugavala nahi tar marathi nibandh मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

surya ugavala nahi tar marathi nibandh
surya ugavala nahi tar marathi nibandh

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध

मेघना, अरे मेघना, चल उठ, सूर्य डोक्यावर आलाय आणि तू अजून लोळत पडली आहेस.” आईची नेहमीची बडबड सुरू झाली. पण काय करणार आई लाही बोलू शकत नाही आणि त्या सूर्यालाही.

हा सूर्य सुद्धा असा कसा एकही दिवस झोपत नाही आणि दुसऱ्यालाही झोपू देत नाही. आज रविवार, सुट्टीचा दिवस पण सूर्य देवता
सुट्टी घेणार नाही. किती मजा येईल ना!

दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही.

मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत.

रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरे वासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील.

सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल. सूर्य उगवला नाही तर… दिवसच नाही.

कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. surya ugavala nahi tar marathi nibandh

दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीत.

सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल.

surya ugavala nahi tar marathi nibandh

 

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध

आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत.

असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत.

शेतातील धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले.

सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य उगवला, सूर्य उगवला!’

तर मित्रांना तुम्हाला “surya ugavala nahi tar marathi nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. ती कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – [email protected]

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

1 thought on “सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar”

  1. Pingback: माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand - निबंध मराठी

Leave a Comment

Your email address will not be published.