वाचते होऊया निबंध मराठी | Vachte Houya Nibandh Marathi

Vachte Houya Nibandh Marathi – मित्रांनो आज “वाचते होऊया निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Vachte Houya Nibandh Marathi

माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्तपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन. म्हणूनच, पुस्तकांना ‘विशाल काळाच्या भव्य सागरातून ममुष्याला तरून नेणारं जहाज’ असंही म्हटलं जातं.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांना आपले सगे मित्र मानले पाहिजे. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृध्दींगत हो पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभूत्व सुध्दा वाढते.

पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते. यामुळेच अनेकजण आपल्याला ‘वाचल तर वाचाल’ असा सल्ला देतात. Vachte Houya Nibandh Marathi

वाचते होऊया निबंध मराठी

आजकाल विविध स्पर्धा परीक्षा, शाळा स्तरावर परीक्षांमध्ये पास होण्यासाठी, विविध परीक्षेत अव्वल येण्याकरता केलेले वाचन एवढाच या वाचनाचा मर्यादित अर्थ घेतला जातो, पण या वाचनाची व्याप्ती फार मोठी आहे आणि याची जाणीव मात्र आज क्वचितच असलेली दिसून येते.

‘वाचन केवळ फक्त आणि फक्त विद्यार्थी दशेत करायचे असते’ असाही विचार करणारे लोक आपल्याला दिसतात. “Vachte Houya Nibandh Marathi”

मात्र वाचन करण्यासाठी कोणतीही प्रकारची वयोमर्यादा नसते, उलट प्रत्येक क्षणाला केलेले वाचन जीवनभर चिरतरुण राहण्यास मदत करते. वाचनाने माणूस समृद्ध होतो.

Vachte Houya Nibandh Marathi

वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येते. शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वाचनातूनच मिळते.

वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात. म्हणूनच, वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते.

वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुख-दुःख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते.

वाचते होऊया निबंध मराठी

आपल्या देशाची संस्कृती विश्वातील एक महान संस्कृती असून ती समृद्ध जीवनाचा सुगम मार्ग दाखवते. तो मार्ग समजून घेण्यासाठी या संस्कृतीचे प्रतिबिंब असेलेली विविध पुराणे, पोथ्या, ग्रंथ, पुस्तकेच आपली मदत करू शकतात. Vachte Houya Nibandh Marathi

वाचनाने मनुष्याला स्वतःचे आत्मभान येते, त्याचा स्वतःचा त्याला स्वतःला नव्याने परिचय होतो. वाचनामधून समर्थपणे व्यक्त होण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते.

विद्यार्थीदशेत वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपली शब्दती वाढते. शिवाय, अनुभवांची मोठी शिदोरी कायमची गाठीशी राहते. हे वाचन विविध निबंधमाला, भाषण स्पर्धा यांसाठी उपयुक्त ठरतेच तसेच यामुळे स्वतःचे मत, तसेच अभिव्यक्तीसाठी हातभार लागतो.

Vachte Houya Nibandh Marathi

या वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे परिसरामध्ये, विविध जन समुद्रयामध्ये तसेच मित्रमंडळीतं वावरताना वेगवेगळ्या विषयांवरील चर्चामध्ये सहभागी होऊन महत्त्वाचे विषय चोखाळता येतात. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होते.

एकंदरीत वाचन मानवाला प्रतिष्ठाही मिळवून देते. वाचन केल्याने इतरांना मनोरंजन देण्याचा हेतू तर साध होतोच, पण सोबतच आपल्याला एक जिवलग दोस्त गवसतो. हा मित्र सर्व परिस्थितीत आपल्या सोबत असतो. {Vachte Houya Nibandh Marathi}

तो विशाल विश्वाच्या या भवसागरात आपणांस तरायला मदत करतो. तो जगण्याचा आशावाद निर्माण करतो, तो सदैव खुश राहायला शिकवतो. हा आपला सखासोबती एका ठिकाणी बसून साऱ्या विश्वाची सैर आपल्याला घडवतो. तो बिकट स्थितीत खंबीर राहायला शिकवतो.

वाचते होऊया निबंध मराठी

केवळ वार केल्यानेच सर्व काळजी, सर्व चिंता मिटून जातात. हा सखासोबती आपले मन आनंदी तर करतोच त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मकताही वाढीस लावतो. या वाचनाच्या छंदाने न जाणारा वेळ आणि त्या वेळेचा आलेला कंटाळा ही बाबच विसरायला होते.

आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या मनोरंजनात्मक सेवेला उभा असणारा हा सखा आपल्याला फक्त देत अन देतच राहतो. खरतर शेवटपर्यंत आपण त्याचे देणेकरी राहतो. शंकर सारडा हे जे प्रसिद्ध समीक्षक आहेच ते म्हणतात ‘पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ, संगत करत राहतात’. “Vachte Houya Nibandh Marathi”

पुस्तकांचे जग किती विशाल किती अथांग असते. संपूर्ण विश्वातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी आपलं अतुट नातं जोडणारी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळचा वेध घेणारी पुस्तक ‘हे विश्वचि माझे घर’ याचा साक्षात्कार पुनः पुन्हा घडवतात. म्हणूनच, यापुढे आपण सर्वच वाचते होण्याचा दृढ संकल्प करूया, विविध विचारांनी समृध्ध होऊया!

तर मित्रांना “Vachte Houya Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “वाचते होऊया निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

माणसाला घडवण्याकरता कोणत्या दोन गोष्टी महत्तपूर्ण ठरतात?

पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन.

वाचनामुळे आपणाला कोणते फायदे होतात?

पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते.

1 thought on “वाचते होऊया निबंध मराठी | Vachte Houya Nibandh Marathi”

Leave a comment