वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी  | Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi

Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi – मित्रांनो आज “वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी ”  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh

माणूस भिकारी नाही. परमात्म्याने निर्माण केलेल्या विश्वाचा तो राजकुमार आहे. या राजकुमाराचे जीवन सीमित कसे असणार? हा कुमार त्याच्या आईशी जोडला गेला आहे. त्याची आई तिच्या आईवडिलांशी तर त्याचे वडील त्यांच्या आई- वडिलांशी जोडले गेलेले आहेत.

ह्या जोडलेल्याचा शोध घेत घेत मागे परतलो तर, तर सृष्टीच्या मुळापर्यंत आपण जोडलेलेच दिसू आणि सृष्टीचा कधी अंत झाला तर तिथेही आपण जोडलेलेच दिसू. आपण दोन्ही बाजूंनी अनंताशी जोडलेले आहोत.

मग आपण भिकारी आहोत काय ? नाही, आपले पाय पृथ्वीशी जोडलेले आहेत. पृथ्वी पाण्याशी जोडलेली आहे. पाणी वृक्षांशी जोडलेले आहे. वृक्षवल्ली अन्नाच्या रूपाने आपल्याला जीवनदान देत आहे. आपल्या जीवनातील सर्व क्षण काळाच्या एकाच मालिकेत परस्परांशी जुळलेले आहेत. {Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi}

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज

भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्या तीन कालप्रवाहाशी आपण जोडलेले आहोत. कालप्रवाह 6 ऋतुंशी जोडलेले आहे, वर्षा, शरद, हेमंत, शिशीर, वसंत अन् ग्रीष्म असे हे ६ ऋतू अयनाशी जोडलेले आहेत. उत्तरायण आणि दक्षिणायण या अनयांशी काळ जोडलेला आहे. [Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi]

या काळातच मास, ऋतु, संवत्सर येतात. काळाची प्रगती ही एका चक्रासारखी असून तोच प्राणिमात्राला उत्पन्न करतो आणि संहारही करतो, हे भगवंताचे सौंदर्य, सौभाग्य, औदार्य, लावण्य सांभाळण्याची खास जबाबदारी या राजकुमारावर आहे. मग तो भिकारी कसा ? माणूस क्षुद्र नाही. तो विराट आहे. किंबहुना, माणूस नाही केवळ विराट आहे. या विराटाच्या संरक्षणाची जबाबदारी या राजकुमारावर आहे. Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi

“वृक्ष संरक्षण कार्य पुत्रवत् मानवैः सदाः छाया फलं प्रदानेन वृक्षा रक्षन्ति रक्षिताः ॥”

झाडे आपले रक्षण करतात. झाडे स्वतःचे आत्मसमर्पण करतात. ते आपल्याला त्यांचेजवळ असलेले पान, फूल, मूळ, खोड, साल, फळ तर देतातच शिवाय गरजेला सावली देतात. आपल्या विश्रांतीची व्यवस्था करतात. आपला सत्कार करतात.

Vruksha Samvardhan Kalachi Garaj

अतिथीला ते मूक संवेदनेने जाणतात अन् म्हणतात “आईये, बैठीये, विश्रांती लिजीयेपिजीये ठंडा ठंडा पानी” लगेच शेजारी वाहणारे झुळझूळ थंड पाणी पिण्याचा इशाराही देतात. या प्रमाणे बऱ्याच गोष्टी न सांगताही सांगून जाणारे आपले वृक्षवल्ली सोयरे आहेत. त्यांचे संरक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. [Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi]

“सांगून गेला संत
वृक्षवल्लीहो सोयरी
विसरू नको मानवा
लिहून ठेव डायरी “

मानव, पशू-पक्षी या सर्वांच्या जीवनात वृक्षांना अनन्यसाधा- रण महत्त्व आहे. वृक्ष हे मानवी जीवनासाठी, पशू-पक्षांसाठी, वरदान आहेत. वृक्षांमुळे आकाशातील ढगांना थंड हवा मिळते त्यानंत्रच पृथ्वीवर मुसळधार पाऊस पडतो. या पावसामुळे धरणीमाता,शेतकरी शेतमजूर, पशू-पक्षी तृप्त होऊन जातात, पृथ्वीवर सजीवांना जीवंत गहण्यासाठी पाण्याची गरज असते आणि हे पाणी वृक्षामुळे मिळते यावरून पृथ्वीवर वृक्षाचे महत्त्व लक्षात येते. कवी मधुकर आरकडे वृक्षाचा महिमा वर्णन करताना म्हणतात की,

” नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू”

“फळाफुलांचा त्यावरी
नाही आलारे बहरू
क्षणभर वाटसरू
विसावेल सावलीत”

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी

वृक्ष हे परोपकारी असतात. वृक्षामुळे मानवाला प्राणवायु मिळतो, वृक्षांना जनांचा अन्नदाता म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही, वृक्षापासून मानवाला फळे-फुले, औषधे, इंधनासाठीही वृक्षांचा वापर होतो. वेगवेगळी खेळणी, फणिचर, शाळेतील फळा, इत्यादींसाठी वृक्षांचा वापर होतो. {Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi}

वृक्षांमुळे पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते. म्हणून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने एकत्री वृक्ष लाऊन त्याचे संवर्धन केले पाहिजे, ‘एकच लस-एको तीसकोटी वृक्ष’ हा नारा देशाच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन खूप गरजेचे आहे. एका कवीने म्हटले आहे की

” झाडे लावू झाडे जगवू
फुलवूसुद्धा माळराने
सुखसमृध्दी येईल दारी म्हणू
भारत देश महान”

Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh

आज मानव आपल्या स्वार्थासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड करीत आहे. वृक्षलागवड कमी नंं वृक्षतोड प्रचंड होत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, पृथ्वीटी संकटात सापडली आहे. “Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi”

वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमीकमी होत आहे, त्यामुळे शेती व शेतकरी अडचणीत सापडला आहे, वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत आहेत, यामुळे जगलातील हिंस प्राणी गावात, शहरात येत असल्यामुळे मानवापुढे संकट उभे राहिले आहे. म्हणून

“नका तोडू झाडे ।
होऊ नका अविचारी
नाहीतर पुढच्या पिढीचे।
व्हाल तुम्हीच मारेकरी ।।”

तर मित्रांना “Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

पहिली वसुंधरा शिखर परिषद कधी आयोजित करण्यात आली होती?

१९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. 

वनांपासून आपणाला काय काय मिळते?

वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. 

Leave a comment