झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Zadache Atmavrutta Nibandh Marathi

Zadache Atmavrutta Nibandh Marathi – मित्रांनो आज “झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. परवा आम्ही सर्व मित्रमैत्रिणी बागेत फेरफटका मारायला गेलो होतो.

Zadache Atmavrutta Nibandh Marathi

दमून एका सुंदर पर्णसंभार असलेल्या दाट सावली देणाऱ्या झाडाच्या पारावर बसलो. आज सकाळीच बाईंनी शिकवलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या पाठाविषयी चर्चा करता करता मीरा म्हणाली, ” खरंच मित्रांनो, मानवानेच पर्यावरणाचा नाश केला आहे.

प्रचंड वृक्षतोड केली आहे. झाडांना जर मनुष्यवाणी प्राप्त झाली असती, तर स्वत:च्या जीवनाविषयी पर्यावरणाविषयी ती काय बर बोलली असती ? ” तिच्या या कल्पनेमुळे आम्ही वेगळ्याच विश्वात रममाण झालो.Zadache Atmavrutta Nibandh Marathi

वाऱ्याच्या मंद मंद झुळूकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती. असे वाटले, जणू झाडच बोलू लागले.. “अरे मित्रांनो, माझ्याविषयी बोलताय म्हणून मलाही तुमच्या संभाषणात सहभागी व्हावंसं वाटलं.

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी

मघाशी चर्चेत तुम्ही म्हणालात, की पर्यावरणात आमचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, ते बरोबर आहे कारण आम्ही आमच्या मुळांनी जमिनीला घट्ट धरून ठेवतो. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. भूजल पातळी वाढते.

आम्ही पावसाला वेळेवर व व मुबलक प्रमाणात पडण्यासाठी आमंत्रण देतो. चांगला पाऊस पडला, की भरपूर शेतीभाती पिकते आणि बळीराजा खूश होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, की आम्हीही भरून पावतो. “Zadache Atmavrutta Nibandh Marathi”

तुम्हा सर्वाचं पोट भरण्यासाठी शेतीला आवश्यक असणारा पर्जन्यराजा वेळेवर येण्याकरता आमचा थोडासा हातभार लागतो, याचं खूप समाधान लाभतं बघ. जलचक्र सुरळीत चालतं. आमचे भाऊबंद गवत, झुडूप, वेली, वृक्ष इत्यादी प्रकारात आढळतात.

Zadache Atmavrutta Nibandh Marathi

आमच्यातील या विविधतेमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते, आमच्या कुळातील कल्पगृह तर परोपकार करण्यासाठीच जन्मला आहे, कारण मुळापासून शेड्यापर्यंत त्याच्या प्रत्येक अवयवाचा वापर तुम्ही अन्न वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी करता आमचे गुण सांगताना तुम्ही म्हणता की कुणी दगड फेकला तरी आम्ही फळेच देणार कुणी आमच्यावर घाव घालण्यासाठी अंगावर कुहाड चालवली तरी आम्ही त्याला हानी पोहोचवणार नाही. ‘Zadache Atmavrutta Nibandh Marathi’

हे सर्व चांगले गुण निसर्गाने दिले हो” आम्हांला ! तुम्ही जेव्हा परोपकार, दातृत्व वृत्ती सहकार्य भावना अचल किवा खंबीर उभे राहण्याची वृत्ती असे गुण आमच्यात आहेत असं म्हणता, तेव्हा आम्हाला फार आनंद होतो कारण आमच्यात हे गुणविशेष आहेत हे आम्हांलाच ज्ञात नसत.

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी

तुम्ही आमच्यावर सुभाषिते, कथा, गाणी, कविता रचून ते आमच्यापासून बनलेल्या कागदांवर उमटवता; सर्वांना सांगता तेव्हा छान वाटतं. खरं सांगू मित्रांनो ? आज जागतिकीकरणाच्या रेट्यात शहरीकरणाच्या नादात तुमचाच समूह आम्हांला नष्ट करत चालला आहे .

जंगलेच्या जंगले उजाड करू पाहत आहे. त्याने डोंगर अगदी उघडे – बोडके करून टाकले आहेत . निसर्गसंपत्तीचा पर्यावरणाचा -हास झाला आहे. त्यातून पर्यावरणीय समस्या वाढत चालल्या आहेत ‘Zadache Atmavrutta Nibandh Marathi’

अवकाळी पाऊस जागतिक तापमानवाढ,,भूकंप अशा अस्मानी – सुल्तानी संकटांनी पृथ्वी ग्रासून गेली आहे. खंत एवढीच आहे, की आम्हांला नष्ट करून तुम्ही ही सृष्टी आधुनिक यंत्र सामग्रीने विकसित करत आहात .

Zadache Atmavrutta Nibandh Marathi

हे अळवावरचं पाणी मोत्यासारखं दिसेल : पण लगेच घरंगळून जाईल त्याचे काय ? आमचा नाश तुम्ही केलात, तर आम्ही तुम्हाला अजिबात प्रतिकार करणार नाही पण ज्या प्रगतिशील वाटेवर चालण्याचा तुमचा प्रयत्न चालला आहे.

ज्याच्या जीवावर तुम्ही माणसं दिवसरात्र धावत आहात त्या निसर्गाने तुमच्याविरूद्ध बंड पुकारले, तर तुम्ही त्यांच्या रौद्र रूपाचा प्रतिकार कसा करणार आहात ? सांगा कसा करणार आहात ? “Zadache Atmavrutta Nibandh Marathi

म्हणून मित्रांनो, ‘ झाडे लावा, झाडे जगवा’ हे नारे देऊन भागणार नाही, तर परिवारातील एक सदस्य म्हणून तुम्ही आमच्यासोबत संबंध जोडला पाहिजे.

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी

मग बोन्साय करून आमची नैसर्गिक वाढ तुम्ही खुंटवणार नाहीत तर आमच्यासाठी आरक्षित वनक्षेत्रे तयार करून आम्हाला जगवाल, नैसर्गिकपणे वादू दयाल आमचे कायम संवर्धन संगोपन करून पुढच्या पिढीलाही सुखाने नांदवाल.

हे सर्व तुमच्याच हातात आहे आणि ते तुम्ही कराल अशी मला खात्री आहे . एवढे बोलून झाडाने पूर्णविराम घेतला. एकाएकी पानाची सळसळ बंद झाली.

तर मित्रांना “Zadache Atmavrutta Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment