झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi

Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi

Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi – मित्रांनो आज  ‘झाडे लावा झाडे जगवा’  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे !’ खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो.

Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi

चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते.

जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते. “Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi”

झाडाविना ढग गेले
ढगाविना पाणी गेले
पाण्याविना शेती गेली
शतीविना समृद्धी गेली
समृद्धी विना सार हवालदिल झाल
इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले.

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी

आटपाट नगर होतं. तिथली माणसं होती कष्टाकू. कष्ट फार करायची. खूप धान्य पिकवायची प्रेमानं वागायची. सुखानं नांदायची. नदी होती शेजारी, नगराजवळून वाहणारी. डोह होते पाण्यात मजा वाटे पोहण्यात. पाऊस पंडे वेळेवर, पिकं डुलत शेतांवर.

शेतं होती अलीकडं, जंगल होतं पलीकडे, जंगलात होते हल्ली, करत दंगामस्ती.  नदीवर यायचे, डोहामध्ये डुंवायचे. पुढं काय झालं पाऊस मुळी पडेना. प्यायला पाणी मिळेना. शेतं गेली सुकून, लक्ष्मी गेली रूसून. जंगल झालं वैराण, प्राणी झाले हैराण.

हा देखील निबंध वाचा »  माझा आवडता सण दिवाळी विषयी निबंध | Maza Avadta San Diwali Ya Vishayavar Nibandh

ऊन चाललं वाढत. डोह गेले आटत. हल्लीला मिळेना डुंबायला गेला नदीला विचारायला. ‘Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi’

हत्ती नदीला म्हणाला, “गंगामाय, गंगामाय, आता तू वाहत नाहीस. डोहात पाणी साचत नाही. मला डुंबायला मिळत नाही.” नदी म्हणाली, “काय सांगू बाबा तुला ? ढंग इथं थांबत नाहीत. पाऊस मुळी पडत नाही. पाणी मला मिळत नाही. म्हणून मी वाहत नाही. तू ढगालाच जाऊन विचार.” हत्ती गेला ढगाकडे. तो म्हणाला, ढगा, ढगा, रुसलास का ? पाऊस तू पाडत नाहीस.

Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi

नदीला पाणी देत नाहीस. डोहात पाणी साचत नाही. मला डुंबायला मिळत नाही.” ढंग म्हणाला, “आम्ही कुठं नाही म्हणतो ? नेहमीप्रमाणं आम्ही येतो. आम्हांला कुणी अडवत नाही. अडवायला तिथं झाडंच नाहीत, म्हणून आम्ही थांबत नाही. जळणासाठी झाडं तोडली. नवी झाडं नाही लावली.

तू माणसालाच विचार” हत्ती गेला माणसाकडे. तो म्हणाला, “तुम्ही जळणासाठी झाडं तोडली. नवी झाडं का नाही लावली ?” माणूस म्हणाला, “आमच्या हातून चूक झाली. आमची चूक आत्ता कळली. उगाच आम्ही झाडं तोडली. नवी झाडं नाही लावली. म्हणून ढग थांबत नाहीत. पाऊस मुळी पडत नाही. ‘Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi’

आता आम्ही असं करू. जंगल तोडणं बंद करू. सगळीकडं रोपं लावू. घाम गाळून काम करू. रोपांची चांगली निगा राखू. जंगल झाडांनी भरून काढू. झाडांमुळं गारवा नांदेल. गारव्यामुळे पाऊस पडेल. पावसामुळं डोह भरेल. डोहात खूप डुंबायला मिळेल. धरणांमध्ये पाणी भरेल. पाण्यामुळे वीज मिळेल.

हा देखील निबंध वाचा »  रंग नसते तर निबंध मराठी | Rang Naste Tar Nibandh Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी

वीज यंत्रं चालवील. उद्योगधंदे वाढबील. जर पृथ्वीवर मानव आनंदात रहावा असे वाटत असेल तर आधी वृक्ष, वेली, जंगले या हिरव्या वैभवाला जगवले पाहिजे, जपले पाहिजे. स्वतःसाठी काहीच ठेवून न घेता वृक्ष आपल्याला हिरवीगार पाने देतात.

त्याच्यापासून पत्रावळी, द्रोण, औषधी याची देणगी लाभते.  विविध रंगी, सुगंधी फुले आम्हाला प्रसन्नता देतात. रसाळ फळे आमची भूक भागवतात. अन्न शिजवण्यासाठी जळण, घरातील फर्निचर बनवण्यासाठी लाकूड, उत्तम वाद्ये तयार करण्यासाठी उत्कृष्ट लाकूड झाडांच्या खोडापासून मिळते.

उन्हात ते सावली देतात. प्राणवायू पुरवतात. जमिनीची धूप थांबवतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान देणारी जी पुस्तके त्यासाठी कागद तयार होतो, लाकडाच्या लगद्यापासूनच. माणूस मात्र कृतघ्न आहे.

Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi

उपकार करणाऱ्या वृक्षावर हा निर्दय माणूस कुऱ्हाडीचे घाव घालतो. अपकार करणाऱ्यावरही प्रेम करावे हे सांगण्यासाठी संत वृक्षांचेच उदाहरण देतात.

“जो खांडावया घाव घाली। का लावणी जेयाने केली दोघा एकाचि साऊली। वृक्षु दे जैसा” म्हणजे जो अंगाचे तुकडे करण्यासाठी कुन्हाडीचे घाव घालतो आणि जो प्रेमाने रोप लावतो, त्याला आळं करतो, पाणी घालतो आणि काळजी घेतो अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना वृक्ष आपली सावली देतो तसे भाणसाने वागावे असे ज्ञानदेव सांगतात.

माणूस मात्र उपकार करणाऱ्या वृक्षांना इतके तोडतो की जंगलेच्या जंगले नाहीशी होतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात. पण अशी झाडे तोडले गेली की पहाडसुद्धा खचायला लागतात.

हा देखील निबंध वाचा »  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी | Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी

हवेत शुष्कपणा, कोरडेपणा येतो. पावसाचे प्रमाण उजाड प्रदेशात घटते. पावसाअभावीn त्या भागातली शेते पिकेनाशी होतात. धान्य, भाजी कमी होते म्हणून किंमती चढतात. महागाई वाढते. महागाई वाढली की गरिबांच्या हाल अपेष्टा वाढतात.

तर मित्रांना झाडे लावा झाडे जगवा हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे Zhade Lava Zhade Jagva मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

 

 

झाडांपासून आपणाला काय काय भेटते?

झाडांपासून आपणाला ऑक्सीजन, फळे, फुले, लाकूड आणि सावली अशा उपयुक्त गोष्टी भेटतात

झाडे ही सूर्याच्या कोणत्या प्रकारच्या किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात.

झाडे ही सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात.

1 thought on “झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi”

  1. Pingback: झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Zadache Atmavrutta Nibandh Marathi - निबंध मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top